जळगाव मिरर | १४ मे २०२३
दिनांक १४ मे रोजी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव तर्फे जळगाव शहर महानगरपालिका जळगाव व दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत जय सद्गुरु वस्ती स्तर संघ संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्र जळगांव येथे मातृदिन साजरा करण्यात आला. जळगाव शहरातील संत गाडगेबाबा बेघर निवारा केंद्र येथे वास्तव्यास असलेल्या निराधार वृद्ध महिलांचे प्रथम पाद्यपूजन व औक्षण अध्यक्षा सौ मनीषा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रत्येक मातेस पेढा भरवून गुलाब पुष्पाची व भेट देण्यात आली.
यावेळी सर्व मातांच्या शुभहस्ते प्रेमाचे गोड प्रतिक म्हणजे केक कापण्यात येऊन सर्वांना खाऊ घालून तोंड गोड करण्यात आले.याप्रसंगी या मातांच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओसंडून वाहत होते. नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या पुढील कार्यास त्यांनी भरभरून आशीर्वाद दिले. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती ज्योती राणे यांनी केले व कवी यशवंत देव यांची आई हे देवाचे रूप हे रचना सादर केली. रेणुका हिंगु यांनी मातृदिनाचे महत्त्व विषद केले. विद्या जकातदार, योगिता बाविस्कर अर्चना पाटील, नूतन तासखेडकर अँड सीमा जाधव, मरियम बुगडवाला हर्षा गुजराती, वंदना मंडावरे , राधिका पाटील, शरयू पाटील यांनी निराधार मातांचे चरण पूजन करून औक्षण केले. कार्यक्रमास तांत्रिक सहाय्यक किमया पाटील व नीता विसावे यांचे लाभले. कार्यक्रमाचे आभार आशा मौर्य यांनी व्यक्त केले. जय सद्गुरु वस्ती स्तर संघ अध्यक्ष गणेश पाटिल संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्र व्यवस्थापक मनोज कुलकर्णी काळजीवाहक राजेंद्र मराठे हर्षल वंजारी सौ शितल काटे हे उपस्थित होते.