जळगाव मिरर | २० ऑगस्ट २०२४
शहराच्या जवळच असलेल्या बेळी येथील श्री क्षेत्र कुंडलेश्वर संस्थानाच्या भगवान श्री कुंडलेश्वर तीर्थायात्रा समिती द्वारा आयोध्या धाम येथे दिव्य श्रीराम कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
काल या महोत्सवास माजी महापौर सौ. जयश्रीताई महाजन व कृऊ.बा. समितीचे संचालक सुनिलभाऊ महाजन यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या शुभहस्ते आरती करण्यात आली. आरतीच्या वेळी सोबत रावेर चे आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या सुविद्य पत्नी डॉ. अरुणाताई चौधरी, कन्या सौ. नेहा चौधरी याही सहभागी झाल्या. नंतर महाजन दांम्पत्याने कथा वाचक ह. भ. प. भरत महाराज यांचेशी संवाद साधला, त्यांचा आशीर्वाद घेतला. समाजाचे भले करा, जनतेची सेवा करा अशी अपेक्षा महाराजांनी यावेळी व्यक्त केली. महाराजांनी ज्ञानेश्वरीची प्रत देऊन त्यांचा सत्कार केला. महोत्सवात सहभागी भाविकांशी यावेळी महाजन दांम्पत्याने संवाद साधला.