जळगाव मिरर | १३ ऑगस्ट २०२५
डॉ.एस.आर रंगनाथन यांची जयंती व राष्ट्रीय ग्रंथपाल दिनानिमित विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा वाघ नगर येथील ग्रंथालयात ‘ग्रंथ प्रदर्शन’ भरविण्यात आले. या प्रसंगी मुख्याध्यापक श्री. हेमराज पाटील, समन्वयक श्री. सचिन गायकवाड, ग्रंथपाल डॉ. हितेश ब्रिजवासी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
ग्रंथप्रदर्शनाची सुरवात डॉ.एस.आर रंगनाथन यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून करण्य्यात आली. या नंतर ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्याध्यापक श्री हेमराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. हितेश ब्रिजवासी यांनी ग्रंथ प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या पुस्तकांबद्दलची ओळख देण्यात आली.
तसेच डॉ.एस.आर रंगनाथन यांच्या कार्याचा परिचय करून देत त्यांच्या जीवनावर ‘रामायण’ या ग्रंथांचा किती प्रभाव होता हे देखील सांगितले. ग्रंथालयांच्या वापरातून एक आदर्श समाजाची निर्मिती व्हावी यासाठी डॉ.एस.आर. रंगनाथन यांनी दिलेले योगदान आजही ग्रंथालय आणि माहितीशास्त्राचा आधार स्तंभ मानला जातो तसेच वेदांमधील माहितीचा उपस्थित विद्यार्थ्यांना थोडक्यात परिचय करून दिला. यावेळी श्री आकाश शिंगाने, श्री स्वप्निल पाटील, सौ पुनम खर्चाने, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती लाभली.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री सचिन गायकवाड यांनी केले




















