जळगाव मिरर | १७ फेब्रुवारी २०२४
जामनेर तालुक्यातील केकत निंभोरा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित स्वराज्य सप्ताह या कार्यक्रमाच्या निमित्ताने छत्रपति शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरात साफसफाई मोहीम राबवली तसेच महाराजांना पुष्पहार अर्पण करून महाराजांसमोर नतमस्तक करण्यात आले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष सुद्धा करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस अरविंद चितोडिया व राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील व उपस्थित त्यांचे सहकारी जामनेर शहर अध्यक्ष प्रभू झालटे विधानसभा क्षेत्र प्रमुख नरेंद्र जंजाळ तालुका कार्य अध्यक्ष किरण पाटील सामाजिक न्याय विभाग तालुका अध्यक्ष अरविंद तायडे किरण भास्कर पाटील शेंदूरनी शहरअध्यक्ष विलास पाटील चेयरमैन मधुकर शिंदे तालुका उपाध्यक्ष पंडित नाईक पराग नेरकर गौरव पाटील आदी होते.