अमळनेर : विक्क्की उत्तम जाधव
महाराष्ट्र शासनाने NEP ( National Education Policy) अर्थात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून विद्यापीठ व स्वायत्त महाविद्यालयांना लागू करण्याचा आदेश दिले आहेत. त्यानुसार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव संलग्नित असलेल्या स्वायत्त महाविद्यालयांनी नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० त्याअनुषंगाने लागू केले आहे.
प्रताप महाविद्यालयात पदवी व पदवी उत्तर वर्गाच्या प्रथम वर्षासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात विद्यार्थ्यांसाठी “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) समजून घेताना” या विषयावर प्रताप महाविद्यालयातील ‘एनईपी’ चे समन्वयक डॉ. मुकेश भोळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मेजर, मायनर, जनरल, इलेक्टिव्ह, ओपन इलेक्टिव्ह, स्किल, (मुख्य विषय, सामान्य विषय, इतर शाखेतील विषय,कौशल्याधिष्ठीत विषय,) इत्यादी विषयाबद्दल, विषय निवडीबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी चर्चा, गट चर्चेतून व कार्यशाळेतून विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला व त्यांच्या शंका दूर करण्यात आल्या. तसेच परीक्षेचे स्वरूप आणि नोकरीच्या विविध संधी याबाबतीतही मार्गदर्शन केले. काळाची पाऊले ओळखून नव्या अभ्यासक्रमाची रचना तयार करणे हे नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्टे असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी संस्थेचे चिटणीस तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.बी.जैन यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरण समजून घेणे ही काळाची गरज आहे. जागतिकीकरणाच्या काळात कौशल्याधिष्ठीत अभ्यासक्रमाची आवश्यकता आहे. त्यानुसार व्यावसायाभिमुख अभ्यासक्रमाची रचना करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी सहचिटणीस डॉ. धीरज वैष्णव, उपप्राचार्य डॉ. जयेश गुजराथी, डॉ.जयंत पटवर्धन, डॉ. जी. एच. निकुंभ, प्रा. पराग पाटील, डॉ. कल्पना पाटील, डॉ. विजय मांटे, तसेच एनईपी समिती सदस्य डॉ. विजय तुंटे, डॉ.धीरज वैष्णव, डॉ. योगेश तोरवणे, प्रा. किरण भागवत, प्रा.रोहन गायकवाड, विजय साळुंखे यांसह विविध विभागाचे विभागप्रमुख, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ.विजय मांटे यांनी केले तर आभार प्रा. विजय साळुंखे यांनी मानले. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.