• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

“डॉ. घोलप प्रकरणात नवे वळण: तक्रार मागे घ्यावी म्हणून बंदुकीचा धाक!”

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 9, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
“डॉ. घोलप प्रकरणात नवे वळण: तक्रार मागे घ्यावी म्हणून बंदुकीचा धाक!”
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ ऑगस्ट २०२५

गेल्या काही दिवसापासून जळगाव मनपातील अधिकारी आपल्या कारनाम्याने चर्चेत असतांना आता चक्क आपल्या विरुद्धची तक्रार मागे घेण्यासाठी महापालिकेच्या प्रमुख वैद्यकिय अधिकारी डॉ. विजय घोलप यांनी पाठवलेल्या ठेकेदाराने बंदूक दाखवून धमकी दिल्याचे लैंगिक छळ प्रकरणातील तक्रारदार महिलेने म्हटले आहे. तक्रार मागे घेण्यासाठी महिला तक्रार निवारण समितीच्या सदस्य असलेल्या महिलेनेच धमकावल्याचा आरोपही त्यांनी साक्षीत केला आहे.

मनपातील महिला अधिकाऱ्याचा डॉ. विजय घोलपकडून होणाऱ्या लैंगीक छळ प्रकरणात चौकशीतून अनेक पैलू समोर येत आहेत. तक्रारदार महिलेने सहा पानी जबाबातून अनेक गौप्यस्फोट केले आहेत. एकूण ११४७ शब्दांच्या जबाबातून तक्रारदाराने आपबिती व्यक्त करत डॉ. घोलप याला नोकरीतून काढून टाकत पोलिसात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मनपाच्या वैद्यकीय विभागातील आपल्या सहकारी अधिकाऱ्याचा लैंगिक छळ केल्याचा आरोप निलंबीत प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप यांच्यावर आहे. १८ जून रोजी आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल झाली आहे. त्यानंतर महापालिकेतील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. दरम्यान, दीड महिन्यांच्या कालावधीनंतर डॉ. घोलप यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तक्रारदार महिला अधिकाऱ्याची साक्ष शुक्रवारी (८ ऑगस्ट) नोंदवण्यात आली. यात त्यांनी त्यांच्या छळाची आपबिती कथन केली आहे. डॉ. घोलप हा इच्छेविरूध्द शरीर संबंधाची मागणी करणे, घाणेरडे सुचक इशारे, फ्लाईंग किस, हात लावण्याचा प्रयत्न करणे तसेच हावभाव करून छेडखानी करीत असल्याचे त्यात म्हटले आहे. नोकरी जाण्याची तसेच बदनामी होण्याच्या भीतीमुळे हा त्रास अनेक महिने सहन करीत होते. परंतु आता असहाय्य झाल्यामुळे तक्रार केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

डॉ. घोलप याने तक्रारदाराला माफीनामा फाडून टाकण्याचे तसेच समितीसमोर खोटे सांगण्यासाठी धमकावण्याचा व घाबरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. महापालिकेच्या तक्रार निवारण समितीने या प्रकरणी डॉ. घोलपवर कठोर व नोकरीतून काढून टाकण्याची कारवाई ताकदीने करावी अशी मागणी करत समितीच्या माध्यमातून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची विनंतीही संबंधित महिला अधिकाऱ्याने दिलेल्या जबाबात केली आहे. तसे केले तरच भविष्यात महानगरपालिकेमध्ये कोणत्याही महिला कर्मचाऱ्याला त्रास होणार नाही आणि न्याय मिळेल असेही या साक्षीत म्हटले आहे.

आयुक्तांकडे केलेली तक्रार मागे घेण्यासाठी डॉ. घोलप यांनी वेगवेगळ्या माध्यमातून दबाव आणल्याचे महिला तक्रारदाराचे म्हणणे आहे. आपल्याच कार्यालयातील स्टाफला घरी पाठवणे, पतीच्या कार्यालयात स्वतः जाऊन धमकावणे यासह कार्यालयात बंदूक बाळगलेल्या कॉन्ट्रॅक्टरकडून धमकी दिल्याचेही साक्षीत नमूद केले आहे. त्यामुळे बंदूक दाखवणारा तो कॉन्ट्रॅक्टर नेमका कोण ? हा देखिल तपासाचा मुद्दा राहणार आहे. महिला तक्रार निवारण समितीची माजी सदस्य असलेल्या प्रगती चोंदकाले यांनीही तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणल्याचे जबाबात म्हटले आहे. त्यामुळे दबाव आणणाऱ्या कर्मचाऱ्यांवर काय कारवाई केली जाते, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.

Related Posts

शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर? आयकर विभागाच्या डेटाअभावी अंमलबजावणीला ब्रेक !
जळगाव

शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर? आयकर विभागाच्या डेटाअभावी अंमलबजावणीला ब्रेक !

July 10, 2026
अभाविप स्थापना दिन व राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त ११०० शुभेच्छा कार्डांचे वितरण !
जळगाव ग्रामीण

अभाविप स्थापना दिन व राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त ११०० शुभेच्छा कार्डांचे वितरण !

July 10, 2026
चाळीसगावात गुटखा तस्करांवर पोलिसांचा मोठा प्रहार; पाच जण जेरबंद, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त
जळगाव

चाळीसगावात गुटखा तस्करांवर पोलिसांचा मोठा प्रहार; पाच जण जेरबंद, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

July 10, 2026
गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी पूज्य किरीट भाईजी जळगावात येणार !
जळगाव

गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी पूज्य किरीट भाईजी जळगावात येणार !

July 10, 2026
भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
शासनाच्या पैशांवर डल्ला?; जळगाव बांधकाम विभागातील ‘फॅमिली टेंडर’ प्रकरणाची जोरदार चर्चा, तत्कालीन अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का ?
क्राईम

शासनाच्या पैशांवर डल्ला?; जळगाव बांधकाम विभागातील ‘फॅमिली टेंडर’ प्रकरणाची जोरदार चर्चा, तत्कालीन अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का ?

July 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
तुमच्या टीव्हीचा डिस्प्ले गेला? महागड्या बदलाऐवजी आता कमी खर्चात रिपेअरची सुविधा जळगावात ; मोफत पिकअप-ड्रॉप !

तुमच्या टीव्हीचा डिस्प्ले गेला? महागड्या बदलाऐवजी आता कमी खर्चात रिपेअरची सुविधा जळगावात ; मोफत पिकअप-ड्रॉप !

July 10, 2026
शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर? आयकर विभागाच्या डेटाअभावी अंमलबजावणीला ब्रेक !

शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर? आयकर विभागाच्या डेटाअभावी अंमलबजावणीला ब्रेक !

July 10, 2026
अभाविप स्थापना दिन व राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त ११०० शुभेच्छा कार्डांचे वितरण !

अभाविप स्थापना दिन व राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त ११०० शुभेच्छा कार्डांचे वितरण !

July 10, 2026
चाळीसगावात गुटखा तस्करांवर पोलिसांचा मोठा प्रहार; पाच जण जेरबंद, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

चाळीसगावात गुटखा तस्करांवर पोलिसांचा मोठा प्रहार; पाच जण जेरबंद, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

July 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group