जळगाव मिरर । १४ मे २०२३
वैद्यकीय सेवा देताना सर्वोत्तम राहा. केवळ डॉक्टर म्हणून नव्हे तर चांगले माणूस म्हणून समाजात जा. रुग्णाचे मन जिंकले तरच तुमच्या पदवीची आणि वैद्यकीय सेवेची पत आहे. रुग्णांना आपत्कालीन सेवा हवी असेल तर त्यासाठी तत्पर राहिले पाहिजे, असे प्रतिपादन नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक डॉ. बी.जी. शेखर यांनी केले.
गोदावरी फाउंडेशन संचलित, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि धर्मार्थ रुग्णालय जळगाव खुर्द. मधील सन 2017 चा पदवी प्रदान सोहळा रविवार दिनांक 14 रोजी सायंकाळी जळगाव येथील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात उत्साहात झाला. या पदवी प्रदान सोहळ्यात 100 एमबीबीएस विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आला. या पदवी प्रदान सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र डॉ. शेखर पाटील, गोदावरी समूहाचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.ऐन ऐस आर्वीकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, डॉ.माया आर्वीकर, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रेमचंद पंडित,माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. नागेंद्र, डॉ.ढेकळे हे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक डॉ. बी.जी. शेखर बोलत होते. प्रसंगी मंचावर गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन. एस. आर्वीकर, डॉ. माया आर्वीकर, डॉ. नागेंद्र, रजिस्ट्रार प्रमोद भिरूड आदी उपस्थित होते. याप्रसंगी ते बोलत होते.
सुरुवातीला मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून देवी धन्वंतरी आणि सरस्वती यांच्या मूर्तीला माल्यार्पण केले. यानंतर अधिष्ठाता डॉ. आर्वीकर यांनी मनोगत व्यक्त केले. यशस्वी होण्यासाठी कोणताही शॉर्टकट्स नाही. टाकीचे घाव सोशल्याशिवाय देवपण येत नाही. विद्यार्थ्यांनी वैद्यकीय क्षेत्रात सेवा देताना निस्वार्थीपणे द्यावी असे त्यांनी सांगितले. यानंतर डॉ. बी. जी. शेखर यांनी विद्यार्थ्यांना त्यांचे पदवी घेतल्याचे अनुभव घेतले.
केवळ डॉक्टर म्हणून नव्हे तर चांगले माणूस म्हणून समाजात जा. काहीतरी वेगळे करून् दाखवा. तुम्ही पैशाच्या नव्हे पैसा तुमच्या मागे लागला पाहिजे. माणसे कमावली पाहिजे. तुम्ही वेळेवर रुग्णावर उपचार करतात, तेव्हा डॉक्टर त्यांना देवासारखे असतात. आपातकालीन काळात डॉक्टरांची सेवा महत्वाची आहे. दुसऱ्याला आदर द्यायला शिका, असे सांगून, रुग्णाला मानसिक आधार देणेही महत्वाचे आहे, असेही ते म्हणाले.
यानंतर विद्यार्थ्यांना मान्यवरांनी पदवी प्रदान करून त्यांना भावी वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या. प्रसंगी गोदावरी फाऊंडेशन प्रेरणास्रोत श्रीमती गोदावरी वासुदेव पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील यांची प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक, डॉक्टर्स, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांचे पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सोहळा अतिशय भावनिक आणि आनंदमय वातावरणात संपन्न झाला.