
जळगाव मिरर | २३ एप्रिल २०२६
जळगांव मेहरून परिसर येथील मौजे गट क्रमांक ४२४/२ मधील कंजरभाट समाज स्मशानभूमी विकसित व सुशोभीकरण करण्याबाबत.
सदर निवेदनादनात कंजरभाट समाजाची स्मशानभूमी सध्या अत्यंत दुर्लक्षित व गैरसोयीच्या अवस्थेत आहे.
स्मशानभूमी ही प्रत्येक समाजासाठी अत्यंत पवित्र व संवेदनशील ठिकाण असते. मात्र, सद्यस्थितीत या ठिकाणी कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अंत्यसंस्काराच्या वेळी समाजबांधवांना अनेक अडचणी व हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. पावसाळ्यात चिखल, उन्हाळ्यात सावलीचा अभाव, पिण्याच्या पाण्याची व वीजेची सुविधा नसणे, बसण्याची योग्य व्यवस्था नसणे, तसेच रस्त्याची व स्वच्छतेची अपुरी व्यवस्था ही अत्यंत गंभीर बाब आहे.
तसेच, सदर ठिकाणी नाला असून त्यास दोन्ही बाजूंनी भिंत बांधून वरून स्लॅब टाकणे विसाव्या साठी देखील जागा सुनियोजित अत्यावश्यक आहे. म्हणून आपणास विनम्र विनंती आहे की, सदर स्मशानभूमीमध्ये खालीलप्रमाणे आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात :
संपूर्ण परिसराला संरक्षण भिंत (कंपाउंड वॉल) करणे,अस्थी ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष (रूम) बांधणे पिण्याच्या पाण्यासाठी बोरवेल व पिण्याच्या पाणी व्यवस्था करणे वीज जोडणी करणे स्मशानभूमीकडे जाण्यासाठी योग्य रस्ता तयार करणे परिसराची नियमित स्वच्छता व देखभाल करणे नाल्यावर भिंत व स्लॅब बांधकाम करणे ह्या कामांबाबत निवेदन देण्यात आले या प्रसंगी अध्यक्ष योगेश बागडे,कार्यध्यक्ष शशिकांत बागडे मुख्य सल्लागार मोहन गारुंगे,सचिव राहुल नेतलेकर ,संजय मोती खजिनदार वीर दहियेकर संदीप बागडे,पंकज गागडे,गणेश बागडे,सुमित माछरे, अर्जुन माछरे,आदी समाजबांधव उपस्थित होते. या वेळी महापौर दिपमालाताई काळे यांनी शहर अभियंता श्री योगेश बोरोले यांना कारवाईच्या सूचना केल्या






















