जळगाव मिरर | १९ नोव्हेबर २०२३
प्रत्येक परिवारात पती- पत्नीमध्ये नियमित छोटे मोठे भांडण होत असते. आपल्या पतीच्या अनैतिक संबंधाला कटांळून २५ वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कल्याण शहरात घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांनी जावयाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण शहरात पती-पत्नी राहत असून पती एका शिपींग कंपनीत कामाला आहे. त्यामुळे त्याला सतत युक्रेनला जावं लागतं. या दरम्यान त्याचे एका महिलेशी अनैतिक संबंध जुळून आले. यातुनच या पती पत्नीच्या संबंधांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. मयत महिलेने साधारण सप्टेंबरमध्ये आपल्या पतीचे दुसऱ्या महिलेसोबतचे फोटो पाहिले होते
त्यानंतर तिने पतीच्या विवाहबाह्य संबंधांला आणि युक्रेनलाही जाण्यास विरोध केला होता. मात्र ८ नोव्हेंबर रोजी त्याने पत्नीला फसवले. मुंबई येथील कार्यालयात जात असल्याचे सांगून तो युक्रेनला परस्पर निघून गेला. युक्रेनला पोहचल्यानंतर त्याने पत्नीला मेसेज पाठवून, तो युक्रेनमध्ये आला आहे आणि परत भारतात येण्याचा कोणताही विचार नसल्यांच कळवलं होतं. त्यामुळे निराश झालेल्या पत्नीने आपलं आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. आत्महत्येपूर्वी महिलेने आपल्या जवळील मित्रांना मेसेजही केला होता. तसंच पती परत भारतात येत नसल्याची माहिती तिने आपल्या आईला दिली होती. दरम्यान पत्नीच्या आत्महत्येची बातमी समजताच पती युक्रेनहून कल्याणला आला होता. दरम्यान पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतील अटक करण्यात आली आहे.