चाळीसगाव : कल्पेश महाले
भरधाव वेगाने नांदगावहून धुळेकडे जाणाऱ्या ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या इसमास जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ७:१५ वाजेच्या दरम्यान खडकी बायपासजवळ घडली. मयत इसमाचे नाव अशोक शांताराम मराठे (६५, देवळी, ता. चाळीसगाव) आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक मराठे हे खडकी बु गावाजवळील चाळीसगाव खडकी बायपास महामार्गावर रस्ता ओलांडत असताना बुधवारी सायंकाळी ट्रकने जोरदार धडक दिली. यामध्ये अशोक मराठे हे जागीच ठार झाले. घटनास्थळी असलेल्य सीसीटीव्हीच्या फुटेजवरून ट्रकच माहिती उपलब्ध झाली. ट्रक धुळेकडे गेल्याचे लक्षात आल्याने खडकी टोल येथील सीसीटीव्ही कॅमेरा तपासल असता ट्रकचा क्रमांक आरजे ११ / जी स ०५१३ असल्याची माहीती प्राप्त झाली शिरपूर टोलनाक्यावर भरधाव वेगात येत असताना नाकाबंदी ठिकाणी हजर असलेले पोना तुळशीराम पाटील यांनी रात्री १०.५० वा. अडवून ट्रक चालकास पकडले. चाळीसगाव पोलिसांच्य पथकाने लागलीच ट्रकसह चालकाल ताब्यात घेतले.