जळगाव मिरर | ६ ऑगस्ट २०२४
पोलीस ठाण्याच्या आवारात साफसफाई करत असताना स्वच्छता करण्यासाठी औषधाची बाटली उघडताना तोंडात विष गेले. त्यामुळे विजय दिलीप गोयर (वय ३९, रा. पहुर ता. जामनेर) यांच्यावर उपचार सुरु होते. उपचार सुरु असतांना सोमवार दि. ५ ऑगस्ट रोजी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील पहूर येथे विजय दिलीप गोयर हेआई, पत्नी, दोन मुलं यांच्यासह वास्तव्याला होते. गेल्या १५ वर्षांपासून पहूर पोलीस ठाण्यात स्वच्छता कर्मचारी म्हणून कामाला होते. दरम्यान रविवार दि. ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पोलीस ठाण्याच्या आवारात स्वच्छता करत होते. स्वच्छतेसाठी लागणारी औषधाची बाटली उघडत असताना अचानकपणे औषध हे तोंडात गेले. त्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले. ही बाब लक्षात आल्यानंतर पोलीस ठाण्याच्या आवारातील कर्मचाऱ्यांनी तातडीने खाजगी वाहनातून दाखल करत जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना सोमवारी ५ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता उपचारादर मृत्यू झाला आहे. याबाबत जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
विजय गोयर पश्चात आई लिलाबाई, पत्नी राधिका, दोन भाऊ आणि दोन मुलं असा परिवार आहे. घरातील कर्ता व्यक्तीच्या निधनामुळे गोयर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान या घटनेनंतर पोलिसांकडून त्यांना तातडीची आर्थिक मदत देण्यात आली आहे.