जळगाव मिरर | ११ जुलै २०२३
अमळनेर तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांत एकाचा साप चावल्याने, तर दुसऱ्याचा विहिरीत तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.
अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथील नीलेश युवराज पाटील (१५) याला ९ रोजी सायंकाळी ७ वाजता रवींद्र देविदास पाटील यांच्या घराबाहेर पायाच्या बोटाला साप चावला. त्याला तातडीने उपचारासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. गडखांब येथील पंकज पाटील व विश्वासराव पाटील हे गडखांब शिवारातील त्यांच्या गट नंबर २११/१ च्या शेतातील विहिरीच्या पाइपची जोडणी करत असताना, मांजर्डी येथील सोनू अशोकगीर गोसावी (वय २३) हा मतिमंद तरुण १० रोजी दुपारी ३:४५ वाजता तिकडून आला. त्याचा तोल जाऊन विहिरीत पडन मृत्यू झाला.