
जळगाव मिरर | १३ एप्रिल २०२४
एस.आर.बी इंटरनॅशनल स्कूल येथे दि.१५ ते ३० एप्रिल २०२४ पर्यंत भव्य क्रीडा उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
एस.आर.बी इंटरनॅशनल स्कूलच्या परिसरातील सर्व विद्यार्थी खेळाडूंना “एकच ध्यास क्रीडा क्षेत्राचा विकास “खेळा सुदृढ व निरोगी राहा” हा संदेश देत क्रीडा प्रशिक्षण शिबीरात सहभागी होण्यासाठी निमंत्रण देत आहोत.या क्रीडा प्रशिक्षण शिबीरामध्ये विद्यार्थी खेळाडूंनी सहभागी होऊन त्यांच्यातील सुप्त लढाऊ गुणवत्ता, जिदद, चिकाटी,धाडस,लवचिकता, वेग,दमदारपणा व आत्मविश्वास वाढण्यास नक्कीच या शिबीरातून प्रोत्साहन मिळणार आहे. सदर शिबीर खेळाडूंसाठी मोफत आहे,तरी जास्तीत जास्त खेळांडूनी सहभाग घ्यावा.
शिबीरातील क्रीडा प्रकार-व्हॉलीबॉल, कबड्डी,खो-खो, बास्केटबॉल, रिंगटेनिस,योगा, क्रिकेट, बॉक्सिंग, स्केटिंग,फुटबॉल आकर्षण-ट्रेकिंग,क्रीडा प्रदर्शन,चित्रकला,पॅराशुट,मिकी माऊस,स्विमिंग,परेड,विविध सब्जेक्ट ऍक्टिव्हिटी उपक्रम वयोमर्यादा :१७ वर्षाखालील मुला/मुलींसाठी आहे. नर्सरी,ज्युनिअर केजी,सिनियर केजीच्या मुला/मुलींसाठी मनोरंजक खेळांचे विविध उपक्रम आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात क्रीडा तज्ञ व विषय तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
एस.आर.बी इंटरनॅशनल स्कूल येथे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरामुळे पुढील येणाऱ्या शालेय तालुका जिल्हा,विभाग, राज्य क्रीडा स्पर्धेसाठी नक्कीच विद्यार्थी खेळाडूंचा फायदा होईल.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कला कौशल्य आणि खेळालाही तेवढेच प्राधान्य दिले पाहिजे.विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासोबत त्याची शारीरिक, मानसिक,सामाजीक व कलागुण जोपासण्यासाठी हे सर्व महत्त्वपूर्ण आहे, यासाठी एस.आर.बी इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन डॉ.धीरज बाविस्कर,संचालिका मानसी बाविस्कर,प्राचार्य सुभाष पटले यांनी या उन्हाळी क्रीडा शिबिरासाठी जास्त जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आव्हान केले आहे. या भव्य उन्हाळी किडा शिबिरासाठी क्रीडाशिक्षक श्री.मयुर बोरसे शिक्षक वृंद अथक परिश्रम घेत आहेत.



















