
जळगाव मिरर । २९ डिसेंबर २०२२

शहरातील एका परिसरातील रहिवासी असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना शहरात घडले या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील एका परिसरात आपल्या परिवारासह वास्तव्यास असलेल्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी दिनांक 25 नोव्हेंबर रोजी पासून ते आतापर्यंत नेहमी शाळेत जाताना संशयित आरोपी सादखान आयुब खान (वय १९) त्या मुलीचा पाठलाग करून अश्लील इशारे करून व तिच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी संशयित आरोपी विरोधात जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या असून पुढील तपास एपीआय रविंद्र बागुल हे करीत आहे.




















