जळगाव मिरर | ७ ऑगस्ट २०२४
शहरातील एका परिसरात वास्तव्यास असलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक कृत्याचा व्हिडीओ काढत तो व्हायरल करण्याची धमकी देत मुलीवर शहरातील मेहरूण परिसरातील एका ट्रॅकवर एका वाहनात तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एका भागात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मार्च ते जुलै २०२४ दरम्यान स्नेह किशोर लाठीग्रा उर्फ किशन सोनी वय २० रा. शांती नगर, जुनाखेडी रोड, जळगाव याने ओळखीचा फायदा घेत वेळोवेळी फोनद्वारे पिडीत मुलीला बोलावून त्यांच्या फोनमध्ये लैंगिक कृत्याचे व्हिडीओ बनवून घेतला. त्यानंतर संशयित आरोपी किसन सोनी याने व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवून तिच्यावेळी अत्याचार केला. या त्रासाला कंटाळून पिडीत मुलीने हा प्रकार तिच्या पालकांना सांगितला. त्यानुसार पिडीत मुलीसह तिच्या पालकांनी एमआयडीसी पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार मंगळवार ६ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजता संशयित आरोपी स्नेह किशोर लाठीग्रा याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे हे करीत आहे.