जळगाव मिरर | १४ ऑगस्ट २०२५
जळगाव तालुक्यातील फुपनगरी शिवारातील केळीच्या शेतामध्ये नेऊन ३९ वर्षीय महिलेचा विनयभंग करण्यात आला. ही घटना जुलै महिन्यात घडली होती. याप्रकरणी दि. १२ ऑगस्ट तालुका पोलिस ठाण्यात दगडू रघुनाथ कोळी (रा. रिधूर, ता. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील एका गावात ३९ वर्षीय महिला वास्तव्यास आहे. जुलै महिन्यात सकाळच्या सुमारास संशयित दगडू रघूनाथ कोळी हा महिलेला दुचाकीवर बसवून फुपनगरी शिविरातील शेत रस्त्याने केळीच्या शेतात घेवून गेला. त्याठिकाणी विवाहितेसोबत अश्लिल वर्तन करीत तिच्या मनासलज्जा उत्पन्न होईल असे कृत्य त्यांनी केले. याप्रकरणी महिलेने दि. १२ ऑगस्ट रोजी तालुका पोलीसात तक्रार दिली असून त्यानुसार संशयित दगडू रघूनाथ कोळी (रा. रिधूर ता. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक शामकुमार मोरे हे करीत आहे.




















