जळगाव मिरर | २६ सप्टेंबर २०२४
स्वच्छता व पाणीपुरवठा तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांतून माळी समाजाला मंदिर बांधण्यासाठी 50 लाख रुपये निधी शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आला आहे. माळी समाजाच्या मंदिराचे भूमिपूजन करण्यासाठी गुलाबराव पाटील यांची माळी समाजातील पंचमंडळाने भेट नुकतीच भेट घेतली. आणि येत्या 29 सप्टेंबर रोजी मंदिराच्या भूमिपूजनाचे आयोजन करण्यात आले असून गुलाबराव पाटील यांच्या हस्ते हे भूमिपूजन होणार आहे.
धरणगावातील मोठ्या माळी वाड्यात 2200 स्क्वेअर फुट जागा पडून होती. यासाठी माळी समाजातील पंचमंडळाने या जागेत माळी समाजाचे मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. मात्र मंदिर बांधण्यासाठी मोठा खर्च येत असल्याने माळी समाजातील पंचमंडळाने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मंदिर बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. गेल्या महिन्यातच माळी समाजाच्या मंदिरासाठी 50 लाख रुपयांचा निधी शासनामार्फत उपलब्ध झाला आहे. त्यामुळे पंचमंडळाने मंदिराचे भूमिपूजन गुलाबराव पाटील यांच्या हस्ते व्हावे, त्यासाठी त्यांची भेट घेतली. आणि येत्या 29 सप्टेंबर रोजी धरणगावातील माळी समाज मंदिराचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी धरणगाव माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा नामदेव महाजन, उपाध्यक्ष निंबाजी सदू महाजन, सुखदेव दयाराम महाजन, विनोद माळी, विजय महाजन, निलेश महाजन हे उपस्थित होते