मेष : आज ग्रहमान तुमच्यासाठी अनुकूल आहे. विविध कामांमध्ये व्यस्त असाल. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास यश मिळेल. विद्यार्थ्यांचा करिअरशी निगडीत समस्येवर उपाय शोधल्यास उत्साह वाढेल. धार्मिक कार्यातही तुमचा सहभाग असेल. मनाप्रमाणे कोणतेही इच्छित कार्य करण्यात यश न मिळाल्याने मन निराश राहील; पण धीर सोडू नका आणि प्रयत्न करत राहा. विरोधक तुमच्यासाठी काही अडचणी निर्माण करू शकतात. अनोळखी लोकांवर सहज विश्वास ठेवू नका.
वृषभ : श्रीगणेश म्हणतात की, आज काही खास लोकांशी भेट होईल. तुम्हाला नवीन माहिती मिळेल. संवादाच्या माध्यमातून तुम्ही तुमचे कार्यपूर्ती कराल. चुकीच्या कामांकडे लक्ष न देता आपल्या कार्यात समर्पित व्हा. थोडासा निष्काळजीपणा तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर करू शकतो. अनावश्यक खर्चामुळे गुंतागुंत होऊ शकते. खर्चावर नियंत्रण ठेवा. वाहतूक नियमांचे उल्लंघन करू नका. व्यवसायाशी संबंधित कामांत यश मिळेल.
मिथुन : सध्याची ग्रहस्थिती तुम्हाला अद्भुत शक्ती प्रदान करेल. संपर्क क्षेत्रात झालेली वाढ भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक कामात यश मिळू शकते. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात थोडा वेळ व्यतित केल्याने तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. मालमत्ता किंवा वाहना संदर्भात समस्या जाणवू शकते. व्यवसाय आधुनिक बदल करण्याचा प्रयत्न करा.
कर्क : आज तुम्ही तुमच्या जीवनशैलीत काही सकारात्मक बदल अनुभवाल. जोखीम घेण्याची तुमची तयारी असेल. घाईगडबड टाळा. अनुभवी व्यक्तीशी चर्चा करुनच निर्णय घ्या. तुमच्या योजनेनुसार कामे न केल्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. उत्पन्न वाढीबरोबर खर्च जास्त असू शकतो. कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी ही योग्य वेळ नाही. वैवाहिक जीवन आनंदी राहील. गुडघे आणि सांधे दुखीची समस्या जाणवू शकते.
सिंह : आज कौटुंबिक सुखसोयींशी संबंधित वस्तूंची खरेदी कराल. विद्यार्थ्यांना करिअरशी संबंधित समस्येवर उपाय मिळाल्याने तणावमुक्त वाटेल. एखाद्या विश्वासू व्यक्तीला तुमची योजना सांगितल्यास योग्य सल्ला मिळेल. आवश्यक खर्चातही कपात करावी लागू शकते. छोट्या-छोट्या गोष्टींवर नाराज होणे तुमच्या स्वभावात असेल.
कन्या : शिक्षणाशी संबंधित अडथळा दूर झाल्यामुळे विद्यार्थी पुन्हा त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतील. मालमत्तेसंबंधी कोणताही वाद शांततेने सोडवला जाईल. गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल आहे. कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नका. चुकीच्या कामात वेळ वाया गेल्याने मन निराश होईल. व्यवसायात लाभदायक संधी उपलब्ध होतील.
तूळ : तुमच्या लोकप्रियतेबरोबरच जनसंपर्काची व्याप्तीही वाढणार आहे. काही काळ रखडलेली किंवा अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होतील. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. दिनचर्या नियमित राखा. कोणतीही योजना करण्यापूर्वी, त्यांचा गांभीर्याने विचार करा. आर्थिक व्यवहारात कोणावरही विश्वास ठेवू नका. मार्केटिंगशी संबंधित कामे पूर्ण करण्यासाठी अनुकूल काळ आहे.
वृश्चिक : या महिन्यात तुम्ही अनेक प्रकारच्या कामांमध्ये व्यस्त राहाल. तुमच्या संपर्क क्षेत्रातही वाढ होईल. प्रतिष्ठित व्यक्तींच्या भेटीमुळे फायदा होईल. मौल्यवान वस्तूंची खरेदी देखील शक्य आहे. परदेशात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी चांगली संधी असू शकते. महिन्याच्या सुरुवातीला काही अडचणी येऊ शकतात. नकारात्मक कृती करणाऱ्या लोकांपासून दूर राहा, त्यांचा चुकीचा सल्ला तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर करू शकतो. घरातील मोठ्यांच्या सल्ल्याकडे आणि मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करू नका.
धनु : ग्रहांची स्थिती अनुकूल आहे. तुमचा आत्मविश्वास कायम ठेवा. दृढनिश्चयाने सर्वात कठीण कामे पूर्ण करण्याची क्षमता तुमच्यात असेल. भांडवली गुंतवणुकीसाठी वेळ चांगली. स्वतःवर विश्वास ठेवा. इतरांच्या बोलण्यात अडकून तुम्ही स्वतःचे नुकसान करू शकता. महिन्याच्या सुरुवातीला प्रत्येक हालचालीबाबत सावध राहणे आवश्यक आहे. आळसामुळेकोणतेही काम टाळण्याचा प्रयत्न करू नका.
मकर : तुमची दैनंदिन दिनचर्या समायोजित करा. आज जास्त खर्च करण्याची किंवा कर्ज घेण्याची परिस्थिती टाळा. तसेच, तुम्ही कोणाला वचन दिले असेल तर ते पूर्ण करण्याची जबाबदारीही तुमची आहे, याची जाणीव ठेवा असे श्रीगणेश सांगतात.
कुंभ : काही अडचणी आल्या तरीही तुम्ही तुमच्या सकारात्मक आणि संतुलित विचारातून तुमचा मार्ग शोधू शकाल, असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबात काही काळापासून सुरू असलेले गैरसमज तुमच्या मध्यस्थीने दूर होतील. यावेळी वारसाहक्काशी संबंधित कोणत्याही विषयावर भावांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या योग्य वर्तनाने परिस्थिती सामान्य कराल. कोणतीही नवीन गुंतवणूक टाळा. वैयक्तिक समस्यांमुळे व्यवसायाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता.
मीन : धार्मिक स्थळी गेल्याने तुम्हाला मनःशांती मिळेल. सामाजिक कार्यातही तुमचे विशेष योगदान असेल. तुम्ही अनेक कामांमध्ये व्यस्त असाल. कोणत्याही बेकायदेशीर कामात रस घेवू नका. अनावश्यक वाढलेले खर्च तुम्हाला त्रास देतील. घाई आणि अतिउत्साहामुळे केलेल्या गोष्टी बिघडू शकतात, याची जाणीव ठेवा.