• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

या राशीतील लोकांनी कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका !

आजचे राशीभविष्य दि १५ ऑगस्ट २०२४

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 15, 2024
in राशिभविष्य
0
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज कुटुंबातील ज्‍येष्‍ठांचे आशीर्वाद तुमच्यासाठी वरदान ठरेल. विद्यार्थी त्यांच्या अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करतील. दिवस शांततेत जाईल. काही कामेही अस्वस्थतेमुळे अपूर्ण राहू शकतात. काळजी करू नका परिस्थिती लवकरच सामान्य होईल. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या मदतीने रखडलेली कामे मार्गी लागतील. रक्तदाबाचा त्रास असणार्‍यांनी काळजी घ्‍यावी.

वृषभ : आज शिस्‍त पाळल्‍यास अनेक कामे योग्य प्रकारे पूर्ण होतील. तुमचा जनसंपर्क वाढेल. आळसामुळे तुमचे काम खोळबू शकते, याची जाणीव ठेवा. अनोळखी व्‍यक्‍तीवर विश्‍वास ठेवू नका. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्‍यावी लागेल. राग आणि तणावाचा शरीरावर परिणाम होईल.

मिथुन : आज दैनंदिन कामाच्या ऐवजी तुमच्या आवडीच्या कामावर अधिक लक्ष केंद्रित कराल. कुटुंबातील सदस्याच्या वैवाहिक जीवनात विभक्त होण्याच्या समस्येमुळे तणावाचे वातावरण निर्माण होईल. तुमच्‍या सल्ल्याने अनेक उपाय होऊ शकतात. विद्यार्थ्यांना अपयशाची भीती वाटेल. व्यवसायावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. घरात शिस्तबद्ध वातावरण राहू शकेल. अॅलर्जी किंवा त्वचेच्या समस्या जाणवण्‍याची शक्‍यता.

कर्क : आज कोणत्याही परिस्थितीत तुम्‍ही संतुलन राखाल. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि प्रगत विचारामुळे यशही मिळेल. न्यायालयीन प्रकरणाशी संबंधित सरकारी खटला चालू असेल तर आज काही सकारात्मक निकाल मिळू शकतात. नातेवाईक किंवा जवळच्या व्यक्तीशी संबंधित एखादी अप्रिय घटना मनात निराशा निर्माण करू शकते. रागावर नियंत्रण ठैवा. पैशाच्या बाबतीत कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. व्यवसायात कामाच्या गुणवत्तेकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. मुलांकडे दुर्लक्ष करु नका.

सिंह : आज तुमचे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान असेल. तुमचा सन्मानही होऊ शकतो. मुलाच्या करिअरच्या समस्येवर उपाय शोधून काढल्यास मोठा दिलासा मिळेल. तुम्हाला थोडे चिडचिड वाटू शकते. तुमच्या उणिवा दुरुस्त करा. अन्‍यथा त्याचा परिणाम तुमच्या कार्यक्षमतेवरही होऊ शकतो. लाभाची आशा नसल्याने प्रवासाशी संबंधित कोणतेही काम टाळा. घरातील वातावरण प्रसन्न राहील. ऊर्जा आणि आत्मविश्वासाची कमतरता जाणवेल.

कन्या : आजचा बराचसा वेळ धर्म-कर्माशी संबंधित कार्यात व्यतीत होईल. यामुळे तुम्‍हाला मनःशांती लाभेल. जमिनीशी संबंधित प्रलंबित कामात निर्णय घेण्याची आजच योग्य वेळ आहे. काही जवळच्या लोकांनी सांगितलेल्या गोष्टीबद्दल मनात शंका किंवा निराशेची स्थिती निर्माण होऊ शकते. आपल्या विचारांमध्ये सातत्य आणि संयम ठेवा. कोणतेही काम समजूतदारपणा आणि दूरदृष्टीने करण्याची गरज आहे. पती-पत्नी एकत्र घर-कौटुंबिक काळजी घेण्याच्या योजनांवर चर्चा करतील. वातावरण बदलाचा आरोग्‍यावर परिणाम होण्‍याची शक्‍यता.

तूळ : घरातील वातावरण शिस्तबद्ध आणि आनंदी ठेवण्यात तुमची महत्त्वाची भूमिका असेल. घरातील वातावरण शांततापूर्ण राहील. जवळच्या नातेवाईकाच्या घरी येण्यामुळे एखाद्या विशिष्ट विषयावर गंभीर संभाषण होईल. मुलांवर जास्त नियंत्रण ठेवू नका. तुमच्या वैयक्तिक कामांवर अधिक लक्ष द्या. आयात-निर्यात संबंधित कामात महत्त्वाचे सौदे पूर्ण होऊ शकतात. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. थकवा आणि निद्रानाश यासारख्या समस्या जाणवतील.

वृश्चिक : आज इतरांवर विसंबून राहण्याऐवजी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. तुमच्या बऱ्याच समस्यांचे निराकरण तुम्हाला स्वतःच सापडेल. जवळच्या नात्यातील जुने वादही मिटतील. काहीवेळा कोणत्याही कारणाशिवाय तणावपूर्ण परिस्थिती उद्भवू शकते, ज्यामुळे तुमच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होतो. त्यामुळेच व्यवहारात सकारात्मकता राखणे अत्यंत आवश्यक आहे. आज जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना सकारात्मक परिणाम समोर येऊ शकतात. जुनी मैत्री प्रेमात बदलू शकते.

धनु : आज तुमच्या जीवनात घडणार्‍या घटनेचा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. तुमच्या सल्ल्याला विशेष महत्त्व येईल. तुमची जवळची व्यक्ती किंवा मित्र इर्षेने तुमची प्रतिमा कलंकित करू शकतात याची जाणीव ठेवा. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व स्तरांचा योग्य विचार करा. व्यवसायात आर्थिक बाबींवर अधिक विचार करण्याची गरज आहे. जोडीदाराची तब्येत बिघडल्याने कुटुंबव्यवस्था विस्‍कळीत होवू शकते. आरोग्य उत्तम राहील.

मकर : आज तुमचा जास्तीत जास्त वेळ कुटुंबातील सदस्यांसोबत व्‍यतित करा. यामुळे तुमच्या दैनंदिन दिनचर्येत थोडासा फरक पडू शकतो. आरोग्याच्या किरकोळ समस्यांमुळे तुमचे काही काम अपूर्ण राहू शकतात. तुमच्यावर ताण येऊ देऊ नका. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य तुमच्या समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त ठरेल. व्यवसायात आज परिस्थिती अनुकूल असेल. कौटुंबिक जीवन उत्तम राहील. त्वचेची कोणत्याही प्रकारची अॅलर्जी होऊ शकते.

कुंभ : नशिबाऐवजी कर्मावर अधिक अवलंबून राहणे तुम्हाला अधिक सकारात्मक बनवत आहे. जवळच्या नातेवाईकाच्या घरी धार्मिक नियोजनात व्यस्त राहाल. लक्षात ठेवा की, घरातील एखादी लहान समस्या उग्र स्‍वरुप धारण करु शकते. बाहेरच्या व्यक्तीला तुमच्या कुटुंबात ढवळाढवळ करू देऊ नका. घरातील सर्व सदस्यांनी मिळून समस्या सोडवा. सार्वजनिक व्यवहार, मार्केटिंग, मीडिया इत्यादी व्यवसायात आज फायदेशीर स्थान असेल, अहंकाराबाबत पती-पत्नीमध्ये वाद होऊ शकतो. आरोग्य उत्तम राहू शकते.

मीन : शुभ ग्रह स्थिती तुमचे भाग्य मजबूत करत आहे. लाभाचे नवीन मार्गही सापडू शकतात. कुटुंबातील सदस्याच्या लग्नाशी संबंधित कामांमध्ये तुम्ही व्यस्त राहू शकता. अतिआत्मविश्वास तुमच्या त्रासाचे कारण ठरु शकते. कोणताही व्‍यवहार करताना संयम ठेवा. वैयक्तिक कामाच्या व्यस्ततेमुळे आज व्यवसायाशी संबंधित बहुतेक कामे घरूनच करावी लागतील. जोडीदाराचे सहकार्य तुमचे मनोबल मजबूत ठेवेल.

Related Posts

‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

वाचा आजचे राशिभविष्य दि. २० जुलै २०२६ !

July 20, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

मनोरंजन आणि सामाजिक कार्यक्रमांमधील सहभाग तुमचा उत्साह वाढवेल,

July 3, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

शेअर बाजार किंवा गुंतवणुकीशी संबंधित लोकांसाठीही हा दिवस आशादायक ठरू शकतो.

July 2, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

उत्पन्न वाढवण्यासाठी उचललेले एखादे पाऊल भविष्यात फायदेशीर ठरू शकते.

July 1, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

June 30, 2026
नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
राशिभविष्य

कोणत्याही नवीन भागीदारीत उतरण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. घाई करणे टाळा,

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
भाजपने चिंता करू नये, ‘मोदींना कुठेही पळून जाऊ देणार नाही!’ संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा

भाजपने चिंता करू नये, ‘मोदींना कुठेही पळून जाऊ देणार नाही!’ संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा

November 2, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

‘आमच्याविरोधात साक्ष देतोस?’ थेट डंपर अंगावर घालून साक्षीदाराची निर्घृण हत्या!

November 2, 2026
मध्यरात्री काळाचा भीषण घाला : कार अपघातात भुसावळ पालिका विभागप्रमुखाचा जागीच मृत्यू

मध्यरात्री काळाचा भीषण घाला : कार अपघातात भुसावळ पालिका विभागप्रमुखाचा जागीच मृत्यू

November 1, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

भरवस्तीत चोरट्यांचा डल्ला : दुचाकीसह ५० हजारांची रोकड नेली चोरून !

November 1, 2026

Recent News

भाजपने चिंता करू नये, ‘मोदींना कुठेही पळून जाऊ देणार नाही!’ संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा

भाजपने चिंता करू नये, ‘मोदींना कुठेही पळून जाऊ देणार नाही!’ संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा

November 2, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

‘आमच्याविरोधात साक्ष देतोस?’ थेट डंपर अंगावर घालून साक्षीदाराची निर्घृण हत्या!

November 2, 2026
मध्यरात्री काळाचा भीषण घाला : कार अपघातात भुसावळ पालिका विभागप्रमुखाचा जागीच मृत्यू

मध्यरात्री काळाचा भीषण घाला : कार अपघातात भुसावळ पालिका विभागप्रमुखाचा जागीच मृत्यू

November 1, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

भरवस्तीत चोरट्यांचा डल्ला : दुचाकीसह ५० हजारांची रोकड नेली चोरून !

November 1, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group