अमळनेर : विक्की उत्तम जाधव
अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर स्तंभारोपण आणि ध्वजारोहण करून संत सखाराम महाराजांच्या यात्रोत्सवास उत्सवानिमित्त वाडी संस्थान आणि नदीपात्र भाविक भक्तानी भर्गच्च भरले होते. परमपूज्य संत श्री प्रसाद महाराज तसेच सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा अक्षयतृतीय चा सोहळा पार पडला.
सर्व मान्यवर व भक्तगण वाडी संस्थांनच्या मंदिरात दाखल झाल्यानंतर विठ्ठल रुक्माई मंदिराचे दर्शन व पूजन होऊन त्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता परमपूज्य संत प्रसाद महाराज भक्त गणासोबत वाजत गाजत नदीपात्रात दाखल झाले. यावेळी संत सखाराम महाराज संस्थांनच्या समाधीसमोर अन्नपूर्णा पूजन झाल्यानंतर सुरुवातीला ध्वजारोहण व त्यानंतर स्तंभारोपण करण्यात आले, स्तंभरोपण संस्थानचे पुजारी अभय देव आणि जयदेव देव यांच्या हस्ते तर पौराहित्य जयप्रकाश देव, सुनिल देव, प्रशांत भंडारी, केशव पुराणिक, उदय पाठक, अभय जोशी सारंग पाठक यांनी केले. यावेळी समाधीसमोर टाकलेल्या शामियानात भक्तांची प्रचंड मोठी गर्दी झाली होती, सुरुवातीला परमपूज्य प्रसाद महाराजांनी विविध मान्यवरांना प्रसाद, नारळ आणि निमंत्रन पत्रिका देऊन यात्रोत्सवाची जबाबदारी दिली, त्यानंतर सर्वांनी महाराजांचे आशीर्वाद घेतले.
यावेळी आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार स्मिता वाघ, ऍड ललिता पाटील, डॉ. अनिल शिंदे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, न्यायाधीश गुलाबराव पाटील, डीवायएसपी राकेश जाधव, पोलीस निरीक्षक विजय शिंदे, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, प्रविण पाठक,मनोज पाटील, भैरवी वाघ पलांडे, आदि मान्यवर उपस्थित होते.