जळगाव मिरर | १ ऑगस्ट २०२३
जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू माफिया मोठ्या प्रमाणात सक्रीय असून जळगाव शहरापासून जवळ असलेल्या खेडी खुर्द फाट्याजवळ जळगाव तालुका पोलिसांनी कारवाई करीत एक अर्धा ब्रास वाळूचे ट्रॅक्टर जप्त केले आहे. याप्रकरणी तालुका पोलीस स्थानकात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरापासून कानळदा रस्त्यावर असलेल्या खेडी खुर्द फाट्याजवळील कमान जवळील रोडवर दिनांक ३१ जुलै रोजी जळगाव तालुका पोलीस स्थानकाचे पोलीस कॉन्स्टेबल मनोज राजू पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांनी या परिसरात पाहणी केली असता त्यांना १ हजार ५०० रुपये किमतीची अर्धा ब्रास गौण खनिज वाळू अवैध ट्रॅक्टरच्या मदतीने सुरू होती त्यांनी सदर ट्रॅक्टर अवैध गौण खनिज वाळू चोरटी असल्याचा उद्देशाने मिळून आल्याने त्यांनी लागलीच कारवाई केली. ही घटना ट्रॅक्टर चालकास समजतात त्याने ट्रॅक्टर व ट्रॉली जागीच सोडून पळ काढला याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्थानकात एक ट्रॅक्टर वरील अनोळखी चालक व मालक नाव गाव माहित नसलेले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल दिनेश पाटील हे तपास करीत आहे.