• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

उद्योजकाकडून लाखोंची खंडणी घेणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 16, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
उद्योजकाकडून लाखोंची खंडणी घेणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १६ जानेवारी २०२३

एरंडोल येथील प्रसिद्ध ऑईल मिल चालकास एक पुरुष व एक महिलेने त्यांचे ऑईल मिल बाबत सरकारी कार्यालयात तक्रार करण्यात येईल अशी धमकी देवून त्यांचेकडून 7 ते 8 लाख रुपयांची खंडणी मागणी केल्याने सदर पुरुष व महिले विरुद्ध एरंडोल पोलीस स्टेशन भाग 5 CCTNS गुरनं. 13/2023 भादवि कलम 384, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी एरंडोल पोलिसांनी १ महिलेसह ५ पुरुषांना ताब्यात घेतले आहे.

सविस्तर वृत्त असे कि , एरंडोल येथील मारवाडी गल्लीतील रहिवासी आनंद अनिल काबरे यांचे वडील नामे अनिल गणपती काबरे यांना एक पुरुष व एक महिलेने त्यांचे ऑईल मिल बाबत सरकारी कार्यालयात तक्रार करण्यात येईल अशी धमकी देवून त्यांचेकडून 7 ते 8 लाख रुपयांची खंडणी मागणी केल्याने सदर पुरुष व महिले विरुद्ध एरंडोल पोलीस स्टेशन भाग 5 CCTNS गुरनं. 13/2023 भादवि कलम 384, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात खंडणी मागणारे इसम व महिला है आज दिनांक 16/01/2023 रोजी खंडणी मागण्याकरिता येणार असल्याचे फिर्यादी यांनी कळविल्याने श्री. बालाजी ऑईल मिल एरंडोल येथे पंच व पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सपोनि गणेश अहिरे, पोउनि शरद बागल, पोहेकॉ अनिल पाटील, पोना/ मिलिंद कुमावत, पोना/ संदीप पाटील, पोना/ जुबेर खाटीक, महिला पोना/ ममता तडवी, होमगार्ड पीओ दिनेश पाटील यांचेसह श्री. बालाजी ऑईल मिल एरंडोल येथे सापळा रचला असता दोन महिला दोन इसम हे खंडणी मागण्याकरीता ऑईल मिल मध्ये आले व एक महिला व तीन पुरुष मिलच्या बाहेर थांबले असता ऑईल मिल मध्ये आलेल्या महिलेने अनिल गणपती काबरे यांचेकडून 1 लाख रुपये खंडणी घेतली असता लागलीच रंगेहात छापा टाकुन त्यांना ताब्यात घेतले असता छाप्याची चाहुल लागल्याने मिलच्या बाहेर उभे असलेले एक महिला व तीन पुरुष हे दोन मोटर सायकलवर म्हसावद नाका मार्गे जळगांवकडेस पळुन जात असतांना सपोनि गणेश अहिरे, पोना/जुबेर खाटीक, महिला पोना/ ममता तडवी, होमगार्ड पीओ दिनेश पाटील यांनी त्यांचा पाठलाग करुन महामार्ग पोलीस केंद्र पाळधी व पाळधी दूरक्षेत्र येथील पोलीस अंमलदार यांचे मदतीने पकडून ताब्यात घेण्यात आले आहे.

सदर आरोपीतांना त्यांचे नाव गाव बाबत विचारणा करता त्यांनी त्यांचे नाव  शशिकांत कैलास सोनवणे, वय- 39, धंदा- किराणा दुकान, रा. प्लॉट नं. 228, द्वारका नगर, भुसावळ,  सिद्धार्थ सुनिल सोनवणे, वय- 20, धंदा- शिक्षण, रा. जे.टी.एस. रोड, ताप्ती क्लब, भुसावळ,   मिलिंद प्रकाश बोदडे, वय- 36, धंदा- पत्रकार, रा. तळणी, ता. मोताळा, जिल्हा बुलढाणा,  गजानन आनंदा बोदडे, वय- 32, धंदा- मजुरी, रा. कुलकर्णी प्लॉट धम्मनगर, भुसावळ,  आकाश सुरेश बोदडे, वय- 22, धंदा- चालक, रा. तळणी, ता. मोताळा, जिल्हा बुलढाणा असे सांगुन मिलिंद प्रकाश बोदडे, वय- 36. धंदा- पत्रकार (न्युज 24 महाराष्ट्र). रा. तळणी, ता. मोताळा, जिल्हा बुलढाणा,  यांच्यासह दोन तरुणी याना यापूर्वी वेळोवेळी त्यांचे ऑईल मिल कारवाई करणे बाबत वेगवेगळ्या नावाने सरकारी कार्यालयात अर्ज करुन अनिल गणपती काबरे यांचेकडून 60000 ते 70000 हजार रुपये रोख खंडणी घेतली आहे. तसेच वरील आरोपीतांसोबत आपसात संगनमत करुन अनिल गणपती काबरे यांना श्री बालाजी ऑईल मिल बाबत तक्रार करण्यात याची धमकी दाखवुन त्यांचेकडे 7 ते 8 लाख रुपये खंडणीची मागणी करुन लाख रुपये खंडणी स्विकारली आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या वर नमुद इसम व महिला यांचेकडून खंडणीचे 1 लाख रुपये रोख, 8 मोबाईल, 2 मोटर सायकल, 1 डिझायर कार असा एकुण 10,04,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असुन नमुद आरोपीतांपैकी दोन तरुणी यांचे वयाबाबत साशंकता वाटत असल्याने त्यांना बालसुधार गृह जळगांव येथे जमा करण्यात आलेले असुन उर्वरीत आरोपीतांना अटक करण्यात आलेली आहे. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक सो, जळगांव, मा. अपर पोलीस अधीक्षक सो, चाळीसगांव, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो, अमळनेर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि गणेश अहिरे हे करीत आहेत.

Related Posts

अखेर बनावट फोटो प्रकरणात गुन्हा दाखल; मंत्री महाजन यांच्या बदनामीचा प्रयत्न उघड !
क्राईम

अखेर बनावट फोटो प्रकरणात गुन्हा दाखल; मंत्री महाजन यांच्या बदनामीचा प्रयत्न उघड !

June 19, 2026
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व्यवस्थापन समिती अमळनेरच्या वेदांशू पाटील यांची सदस्यपदी नियुक्ती
जळगाव

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व्यवस्थापन समिती अमळनेरच्या वेदांशू पाटील यांची सदस्यपदी नियुक्ती

June 19, 2026
जळगाव महानगरपालिका इमारत अतिक्रमण साहित्यमुक्त होणार !
जळगाव ग्रामीण

जळगाव महानगरपालिका इमारत अतिक्रमण साहित्यमुक्त होणार !

June 19, 2026
नवीन कानळदा रोडवरील तुंबलेल्या गटारींमुळे नागरिक त्रस्त; आरोग्य धोक्यात !
जळगाव

नवीन कानळदा रोडवरील तुंबलेल्या गटारींमुळे नागरिक त्रस्त; आरोग्य धोक्यात !

June 19, 2026
गुरुपुष्यामृत योगानिमित्त आरोग्यसेवेचा लाभ; १७४ बालकांना सुवर्णभस्म प्राशन, ८७ नागरिकांची त्वचारोग तपासणी
जळगाव

गुरुपुष्यामृत योगानिमित्त आरोग्यसेवेचा लाभ; १७४ बालकांना सुवर्णभस्म प्राशन, ८७ नागरिकांची त्वचारोग तपासणी

June 19, 2026
क्यूआर कोड वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीमवर उपमहापौरांचा सवालांचा भडिमार !
जळगाव

क्यूआर कोड वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीमवर उपमहापौरांचा सवालांचा भडिमार !

June 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अखेर बनावट फोटो प्रकरणात गुन्हा दाखल; मंत्री महाजन यांच्या बदनामीचा प्रयत्न उघड !

अखेर बनावट फोटो प्रकरणात गुन्हा दाखल; मंत्री महाजन यांच्या बदनामीचा प्रयत्न उघड !

June 19, 2026
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व्यवस्थापन समिती अमळनेरच्या वेदांशू पाटील यांची सदस्यपदी नियुक्ती

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व्यवस्थापन समिती अमळनेरच्या वेदांशू पाटील यांची सदस्यपदी नियुक्ती

June 19, 2026
जळगाव महानगरपालिका इमारत अतिक्रमण साहित्यमुक्त होणार !

जळगाव महानगरपालिका इमारत अतिक्रमण साहित्यमुक्त होणार !

June 19, 2026
नवीन कानळदा रोडवरील तुंबलेल्या गटारींमुळे नागरिक त्रस्त; आरोग्य धोक्यात !

नवीन कानळदा रोडवरील तुंबलेल्या गटारींमुळे नागरिक त्रस्त; आरोग्य धोक्यात !

June 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group