जळगाव मिरर | १७ ऑगस्ट २०२४
जामनेर तालुक्यातील नेरी येथील गाडेगाव पुलाजवळ महामार्गावर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वाघूर नदीवरील पुलावर गाडेगावजवळ रस्त्यात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. महामार्गावरील गाडेगाव येथील पुलावर रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. १५ रोजी सकाळी ५:१५ वाजता एम.एच. १९ सी.एफ. ६३३९ या वाहनाचा अपघात झाला. तर दि. १६ रोजी सकाळी ८:३० वाजता एम.एच. २० डी.जे. ८९८७ हे वाहन उलटले. हे वाहन वीस फूट खोल बाजूला पडले. त्यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, वाहनधारकांना जबर मार बसलेला आहे. या खड्यांकडे ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.