जळगाव मिरर । ४ फेब्रुवारी २०२३।
३ फेब्रुवारी २०२३ रोजी शिवाजीनगर येथे सालाबादप्रमाणे यंदाही प्रभू विश्वकर्मा जयंती जळगाव गाडी लोहार समाज मंडळातर्फे उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सिनेट सदस्य श्री विष्णू भंगाळे(शिवसेना जळगाव जिल्हाप्रमुख) श्री.शरद तायडे (शिवसेना महानगरप्रमुख,जळगाव) यांच्या सह व्यासपीठावर समाजातील श्री.डॉ.अनिल लोहार (प्राचार्य,बबन बाहेती कॉलेज)श्री. सोमनाथ गोहिल (वित्त व लेखा अधिकारी क.ब.चौ.विद्यापीठ)श्री. चंद्रशेखर चोपडेकर(अभियंता सा. बां. विभाग,जळगाव)श्री. संजय राठोड(माजी नगरसेवक)श्री. जगन्नाथ गोराणे, श्री विजय राठोड(विद्यमान अध्यक्ष गाडी लोहार समाज मंडळ,जळगाव)श्री.विलास सांगोरे(माजी अध्यक्ष)श्री लक्ष्मणकुमार सांगोरे(माजी अध्यक्ष)श्री.सुरज परदेशी(शिवसेना शहर प्रमुख,अमळनेर) यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाची सुरुवातीला सत्यनारायणाची महापूजा करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रभू विश्वकर्मांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत जळगाव गाडीलोहार समाज मंडळाच्या ज्येष्ठांसह,कार्यकारणी सदस्य व पदाधिकाऱ्यांतर्फे करण्यात येऊन समाजात मागील बऱ्याच वर्षांपासून विविध कार्यात सेवा देणाऱ्या ज्येष्ठ नागरिक श्री.अशोक निळे,श्री.आत्माराम लोहार व श्री शिवशंकर लोहार यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांनी आतापर्यंत केलेल्या समाजकार्याची पावती म्हणून हा सत्कार करण्यात आला.
यावेळी विक्रमी ६ व्यांदा सिनेट सदस्य म्हणून निवडून आलेल्या श्री विष्णू भंगाळे यांचा जळगाव गाडी लोहार समाज मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर मान्यवरांची भाषणे होऊन महिलांसाठी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम ही राबवण्यात आला व त्यानंतर समाजातील दिवंगत झालेल्या सर्व समाज बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि शेवटी स्नेहभोजनाचा आस्वाद घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
प्रभू विश्वकर्मा जयंती निमित्त घेण्यात आलेल्या वरील कार्यक्रमाचे सर्व नियोजन अध्यक्ष-विजय संजय राठोड,उपाध्यक्ष- महेश रतिलाल लोहार,सचिव- अनिल अशोक नीळे ,कार्याध्यक्ष-डॉ.अनिल जगन्नाथ गोराणे,खजिनदार-मनोज मन्साराम गोराणे,सहसचिव-अतुल मधुकर सिद्धपूरे,सह खजिनदार-राकेश कांतीलाल लोहार,प्रसिद्धी प्रमुख-प्रल्हाद आत्माराम गोहिल, कार्यकारणी सदस्य मधुकर सखाराम सांगोरे, घनश्याम मधुकर लोहार, सतीश रतिलाल लोहार, दीपक सीताराम पवार,सोमेश मुकुंदा गोहिल यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मुकुंद गोहिल यांनी केले.
