जळगाव मिरर | २५ जुलै २०२५
नोकरीचे अमिष दाखवून बांग्लादेशी तरुणीला देहविक्री करण्यास भाग पाडणाऱ्या महिलेचा एलसीबीच्या पथकाने पर्दाफाश केला. या ठिकाणाहून बांग्लादेशी तरुणीसह देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या संशयित पुजा आत्माराम जाधव (वय २७, रा. प्रोफेसर कॉलनी) या महिलेला ताब्यात घेतले. शहरातील उच्चभ्रू वस्तीत हा प्रकार सुरु होता. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात विदेशी नागरिक कायदद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जळगावातील प्रोफेसर कॉलनीत एका बांग्लादेशी महिलेला डांबून ठेवत तिच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय करुन घेत असल्याची माहिती पुणे येथील फ्रिडम फर्म या संस्थेला मिळाली. त्यानुसार त्यांनी तात्काळ जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांची भेट घेवून माहिती दिली. त्यानुसार पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना पथक तयार करुन कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार उपनिरीक्षक शरद बागल, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, प्रवीण भालेराव, रविंद्र कापडणे व महिला पोलीस अंमलदार अश्विनी सावकारे यांच्यासह जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील पोहेकॉ भारती देशमुख, पथक तयार करुन कारवाईसाठी रवाना केले.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह पोलिसांनी लागलीच प्रोफेसर कॉलनीत धडकले. याठिकाणी एकाजवळ जावून त्यांनी आवाज दिला असता, पुजा जाधव नामक महिला बाहेर आली. त्यानंतर पोलिसांनी त्या महिलेच्या घराची झडती घेतली असता, एका खोलीत बांग्लादेशी तरुणी भेदारलेल्या अवस्थेत मिळून आली. त्या बांग्लादेशी तरुणीची चौकशी केली असता, तिच्याकडे बांग्लादेशातील आयडी कार्डची झेरॉक्स मिळून आली. तसेच तीची चौकीश केली असता, तिने दि. २३ रोजी नाशिक रेल्वे स्टेशनवर पुजा जाधव हीची भेट झाली. तीने माझ्यासोबत जळगावला तुला चांगली नोकरी देते असे सांगून सोबत आणून तिच्या घरात राहायला दिले. तसेच पैसे घेवून देहविक्री करण्यास सांगितले. तरुणीने तीला नकार दिला असता, तीने शिवीगाळ केल्याचे सांगितले.
बांग्लादेशी तरुणीला जळगावात आणून तिला डांबून ठेवत तिच्याकडून देहविक्रीचा व्यावसाय करुन घेणाऱ्या पुजा आत्माराम जाधव या महिलेविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम व विदेशी व्यक्ती अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच ताब्यात असलेल्या महिलेविरुद्ध यापुर्वी देखील दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हा प्रकार शहरातील प्रोफेसर कॉलनी या उच्चभ्रू वस्तीत सुरु असल्याने खळबळ माजून गेली आहे.




















