जळगाव मिरर / ३ मे २०२३ ।
शेगावचे श्री गजानन महाराज यांच्या जीवनावरील कथानक असलेले नाटक ‘श्री गजानन शेगावीचे’ शनिवार दि. ६ मे रोजी सायंकाळी ६ वाजता शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह महाबळ रोड येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत सौ.मंजुषा अडावदकर यांनी दिली. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील अनेक भक्तांना या नाटकानिमित्ताने एक संधी उपलबद्ध होणार आहे.
शेगावचे सुप्रसिध्द श्री गजानन महाराज यांचे देवस्थान सर्व भक्तगमांस परिचित आहे. त्यांच्या जीवनावरील कथानकाचे नाट्यरुपांतर छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात सादर करण्यात येणार आहे. या नाटकाचे लेखक डॉ. रवि गो-हे असून, दिग्दर्शन सारिका पेंडसे यांनी केले आहे. नाटकाचे सूत्रधार संजय पेंडसे, मार्गदर्शक डॉ. जयंत वेलकर, नेपथ्य सतीश पेंडसे, प्रकाशयोजना किशोर बत्तासे, पार्श्वसंगीत मधुरिका, ऑ. अॅड. आर्यन भाटी, निर्मिती सहाय्य मेघा गो-हे, पुष्पक रुके, मिहीर अवचित आणि ह.भ.प. कृष्णा रामेकर यांचे आहे.