जळगाव मिरर / ११ जानेवारी २०२३
श्री. क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्था संलग्न जळगाव शहर युवक मंडळतर्फे उद्या दिनांक 12 जानेवारी गुरुवार रोजी स्वामी विवेकानंद जयंती निमित्त निमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन शहर युवक अध्यक्ष जितेंद्र शिंपी व अ.भा.युवक कार्याध्यक्ष संदीप सोनवणे यांच्या हस्ते करण्यात येईल व रक्तदान शिबिराचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कुमार सोनवणे यांच्या हस्ते करण्यात येईल. संस्थेच्या 75 व्या अमृत महोत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून याच अनुषंगाने १२ जानेवारी निमित्त स्वामी विवेकानंद जयंती निमित्त या रक्तदानाच्या शिबिरापासून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येत आहे तरी जळगाव शहरातील सर्व युवक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. या शिबिराची वेळ :-सकाळी : 9 : ते दुपारी 01 वाजेपर्यंत तसेच विविध शाखांमध्ये सुद्धा स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात येणार आहे. शिबिराचे ठिकाण – शेठ पत्रू लक्ष्मण शेठ शिंपी समाज वसतिगृह पंचमुखी हनुमान मंदिर रोड चोखामेळा समोर जळगाव येथे उपस्थित राहण्याचे आवाहन शहर युवक अध्यक्ष जितेंद्र शिंपी, युवक सचिव हेमंत शिंपी, निलेश चव्हाण, सागर (चार्ली) शिंपी, प्रसिद्धीप्रमुख विशाल देवरे,यांनी केले आहे.