
जळगाव मिरर | ३ जुलै २०२६

जळगाव शहराकरीता मा.ना.गिरीष महाजन यांचे दुरदृष्टीतुन २५० कोटी रुपये खर्च होऊन मेहरूण सर्व्हे नंबर ३४३ मध्ये विभागीय क्रीडा संकुलचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हल्ली वापरात असलेला रस्ता कच्चा व वहिवटीचा आहे. शहराला भव्य अशी नागरी सुविधा उपलब्ध केली जात असून त्यास रस्ता देखील प्रशस्त असणे आवश्यक आहे.
या करीता आज गुरुवारी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करण्यात आली. या प्रसंगी मा. श्री. प्रवीण गेडाम (भा. प्र. से.), विभागीय आयुक्त, नाशिक यांच्यासह महापौर दिपमाला काळे, आयुक्त आदित्य जीवने, जिल्हा परिषदेच्या सीईओ करिष्मा नायर, प्रांताधिकारी विनय गोसावी, महापालिकेचे शहर अभियंता योगेश बोरोले, नगररचना विभागाचे अमोल पाटील आदी अधिकारी यांनी संयुक्त भेट दिली.
पाहणीदरम्यान सध्या प्रत्यक्ष वापरात असलेलाच विद्यमान रस्ता विभागीय क्रीडा संकुलाच्या वापरासाठी उपलब्ध करून देण्याबाबत आयुक्त, जळगाव महानगरपालिका, सहाय्यक संचालक नगररचना विभाग जळगाव महानगरपालिका तसेच उपस्थित सर्व संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले. त्यानुसार सदर प्रकरणी आवश्यक ती कार्यवाही तातडीने व प्राधान्याने करण्यात येणार आहे.




















