जळगाव मिरर / २० फेब्रुवारी २०२३ ।
शहरातील दादावाडी परिसरातील रामराज्य ग्रुपतर्फे सालाबादप्रमाणे यंदाही “छत्रपती शिवाजी महाराज जयंती” साजरी करण्यात आली. यावेळेस प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक मनोज चौधरी, चंद्रशेखर पाटील, राष्ट्रीय बंजारा टायगरचे अध्यक्ष आत्माराम जाधव, युवा सेना विभागीय सचिव उत्तर महाराष्ट्र विराज कावडीया, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष बाळू दाडे सर, रमेश चव्हाण, स्वप्निल नेमाडे, रिंकू चौधरी, सुशील शिंदे तसेच रामराज्य ग्रुपतर्फे भव्य बाईक रॅलीचा आयोजन हि यावेळी करण्यात आले होते. यावेळी संस्थापक अध्यक्ष:- नितीन जाधव, प्रवीण पाटील, निलेश पाटील, राहुल पाटील, परितोष बोरणारे, महेश पाटील, शेखर ठाकरे, करण राठोड, देवेश बिरपन, धीरज पाटील, राकेश पाटील, विवेक पाटील सर्व मित्र परिवार उपस्थित होते.