जळगाव मिरर । ७ ऑगस्ट २०२३
देशात गेल्या काही वर्षांपासून अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम युद्ध पातळीवर सुरु आहे तर या मंदिरासाठी कुलुपाची देखील निर्मिती करण्यात आलेली आहे. याबाबतची बातमी दोन दिवसापासून सोशल मीडियावर देखील आली आहे. उत्तर प्रदेशात असलेल्या अलिगढ हे गाव हाताने कुलूप बनविण्यासाठी प्रसिद्ध आहे.
उत्तर प्रदेशातील अलीगडमधील एका वयोवृद्ध कलाकाराने अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी ४०० किलोग्रॅम वजनाचे कुलूप हाताने तयार केले आहे तर पुढील वर्षी जानेवारीत राम मंदिर भाविकांसाठी खुले होण्याची देखील अपेक्षा व्यक्त होत आहे. श्री. शर्मा यांनी हे केलेले कुलूप १० फूट उंच, साडेचार फूट रुंद आणि ९.५ इंच जाड असून, त्याला ४ फूट लांब किल्ली आहे.
राम मंदिरासाठी तयार करण्यात येणारे कुलूप हे तब्बल २ लाख रुपये खर्च आला आहे. हे कुलूप बनविण्याचे शर्मा यांनी स्वप्न पाहिले होते आज ते स्वप्न साकारत असताना त्यांना मोठा आनंद होत आहे. भगवान श्रीरामांचे निस्सीम भक्त असलेले सत्यप्रकाश शर्मा यांनी अनेक महिने परिश्रम घेऊन ‘जगातील सर्वात मोठे हस्तनिर्मित कुलूप’ तयार केले आहे. या वर्षीच हे कुलूप मंदिराला भेट म्हणून अधिकाऱ्यांकडे सोपवण्याचा देखील त्यांचा मनोदय आहे.