जळगाव मिरर / ७ एप्रिल २०२३
गुढीपाडव्याच्या निमित्ताने शहरात संस्कार भारतीतर्फे आयोजित भव्य रांगोळी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज दि ७ एप्रिल शुक्रवार रोजी संत ज्ञाेनेश्वर मंदिर येथे उत्साहात झाला .
यावेळी समारंभात साहित्य विधेतर्फे जेष्ठ समीक्षाकार , बालनाट्य लेखक कमलाकर नाडकर्णी व दिग्दर्शक अजित भगत यांना श्रद्धांजली पर एक साहित्यिक कार्यक्रम आयोजित केला गेला. यात वैष्णवी पाटील व निर्गुनी बारी यांनी बाळ नाट्य छटा व पल्लवी कुलकर्णी यांनी कथाकथन, वकुंदा जोशी यांनी भारूड सादर करून त्यांच्या योगदानाला अभिवादन केले.या अतिशय उत्कृष्ट सादरीकरणास जोरदार प्रतिसाद मिळाला. रांगोळी स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे जाहीर झाला.
प्रथम पारितोषिक विभागून – सीमा भारंभे ,वैशाली झोपे,चंचल जंगले (श्रीहरी मंदिर) ,आणि प्रियंका जोशी (ओंकारेश्वर मंदिर) द्वितीय पारितोषिक विभागून – अदिती दलाल ,नेहा नेहेते (दत्तमंदिर ) आणि संपन्ना नेवे ,उज्वला भोळे,विद्या भंगाळे (पंचवटी मंदिर) तृतीय पारितोषिक विभागून – वंदना चौरसिया, संगीता चौरसिया (साई बाबा मंदिर) आणि दत्तात्रय गंधे (दत्त मंदिर) याशिवाय उत्तेजनार्थ प्रथम – प्रतिभा कापडणे, वैदेही पाटील (वरद विनायक मंदिर ) उत्तेजनार्थ द्वितीय – शुभम जाधव ,आबा जाधव (मारुती मंदिर ) याशिवाय प्रोत्साहन पर पारितोषिक प्रथम – रुपाली फालक, अथर्वी फालक (स्वामी समर्थ मंदिर) प्रोत्साहन पर पारितोषिक द्वितीय – श्वेता सोमाणी ,रक्षा भुतडा (मरीमाता मंदिर) प्रोत्साहन पर पारितोषिक तृतीय – भाग्यश्री सोनार ( गणपती मंदिर ) . विशेष रांगोळी सेवा सहभाग पारितोषिक अश्विनी देवळे , स्मिता पिले यांना देण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्कार भारती चे अध्यक्ष श्री.डॉ.सुभाष महाले होते. प्रमुख अतिथी माजी महापौर सौ.सीमाताई भोळे यांच्या हस्ते पारितषिके वितरित करण्यात आली.परीक्षक म्हणून श्रीमती चित्रा भाभी लाठी व श्री अनिल पाटील यांनी परीक्षण केले. कार्यक्रमाची संकल्पना सूत्रसंचालिका सौ.वैशाली पाटील यांची होती .प्रास्ताविक सौ.गीता रावतोळे यांनी केले. आभार सौ.आशा जोशी यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास रेखा लढे, वर्षा बऱ्हाटे, शारदा सावदेकर, संगीता पिंगळे, प्रतिभा नेवे यांनी सहकार्य केले. कार्यकमास संस्कार भारती चे सर्व वरिष्ठ पदाधिकारी, सदस्य व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
