जळगाव मिरर | १६ ऑगस्ट २०२४
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील महाविकास आघाडी आता मैदानात उतरली असून नुकतेच मुंबईत पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या निर्धार मेळाव्यात संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत म्हणाले कि, सुप्रिया ताई लाडकी बहीण आहे महाराष्ट्राची. या बहिणीसाठी महाराष्ट्र लढला. बारामतीत महाराष्ट्र लढला. महाराष्ट्रातील तुमचे लाडके भाऊ आहेत. त्यांनी रंग बदलला. ते पिंक झालेत. सरडा रंग बदलतो. अचानक पिंक कसा होऊ शकतो. आता हा पिंक सरडा बारामती सोडणार असं ऐकलं म्हणत त्यांनी अजित पवारांवर देखील जोरदार हल्लाबोल चढवला.
संजय राऊत म्हणाले की, ओपनिंग बॅटसमनच भाषण झालं. उद्धव ठाकरे यांचं. ही वर्ल्डकपची टीम आहे. आपण एक कप जिंकला आहे, दिल्लीचा. आता महाराष्ट्राचा सामनाही आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही. आज वाजपेयींची पुण्यतिथी आहे. आता बनावट आणि बोगस भाजप आहे. चोरांचा आहे. आम्ही ज्या ओरिजिनल भाजपसोबत काम केलं. त्या वाजपेयींची पुण्यतिथी आहे. मला वाजपेयींच्या कवितेची ओळ आठवते. ती आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. ती मोदी शाह यांच्यासाठी नसेल. हार नही मानुंगा मै, रार नही मानुंगा मैं… आम्ही हार मारणार नाही. झुकणार नाही. हा महाराष्ट्र दिल्लीच्या हुकूमशाहीविरुद्ध झुकणार नाही. वाकणार नाही. तुम्हाला फोडून काढल्याशिवया राहणार नाही. हा या मेळाव्याचा अर्थ आहे” असं संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, आपल्या वक्तव्याने मोदींच्या 56 इंचाच्या छातीची आठवण केली. स्वत: मोदीच विसरले आहेत. ती छातीच नाही. तो मातीचा रिकामा खोका आहे. नुसती छाती जरी असती तर देशाची ही अवस्था झाली नसती. मोदी लालकिल्ल्यावर भाषण करत होते आणि जम्मू काश्मीरमध्ये जवानांचे बलिदान झाले. 30 दिवसात 27 हल्ले झाले. 17 जवान शहीद झाले. अनेक घायाळ झाले. हे 56 इंचाच्या छातीचं सरकार आहे. त्यांच्या छातीतील हवा आपण काढून टाकली आहे” असं संजय राऊत म्हणाले.