जळगाव मिरर । १६ जानेवारी २०२३ ।
शहरातील शिवाजी नगर परिसरातील मजुरी करणाऱ्या परिवाराच्या घरी मध्यरात्रीच्या सुमारास फ्रीजने पेट घेतल्या प्रकरणी जळगाव शहर पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील शिवाजी नगर परिसराती हुडको येथील रहिवासी मुहम्मद शोहेब मोहम्मद इसाक (वय-३७) हे मजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. ते दि १५ रोजी ८.३० वाजेच्या सुमारास आपले काम आटोपून घरी आल्यावर ते आपल्या परिवारासह जेवण करून झोपून गेले मध्यरात्री २.३० वाजेच्या सुमारास अचानक झोपलेलो असतांना अचानक जीव गुदमरायला लागला. तेव्हा बघितले असता त्यांना घरात पुर्ण अंधार दिसला, त्यांनी लागलीच परिवाराला उठवीत घराबाहेर असलेल्या गॅलरीत गेले. त्यानंतर हा प्रकार बघितला असता. घरातील फ्रीजला आग लागलेली दिसली शेजारी राहनारे दीपककुमार गुप्ताजी यांनी मनपाच्या अग्निशामक विभागाला फोन करुन बोलावले अग्निशामक विभागाने पुर्ण आग विझवली असुन सदर आगीमध्ये त्यांच्या घरातील गोदरेज कंपनीचे १० हजार रुपये किमतीचे फ्रीज जळुन खाक झाले आहे. या प्रकरणी त्यांनी आज दि.१६ रोजी शहर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोना.ललित भदाणे हे करीत आहेत.