मेष : आज कोणतेही काम प्रामाणिकपणे व निष्ठेने केल्यास तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळवता येतील. जमीन किंवा वाहन खरेदी-विक्रीसाठी योग्य वेळ आहे. तीर्थयात्रेला जाण्याचा कार्यक्रम होऊ शकतो. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. तरुणांनी ध्येयाकडे दुर्लक्ष करू नये. खरेदी करताना तुमच्या आर्थिक बाबींचा विचार करा. व्यवसायात कोणताही निर्णय घेताना घरातील ज्येष्ठांचे सहकार्य घेणे आवश्यक ठरेल. घरात सुख-शांतीचे वातावरण राहिल. छोट्या-छोट्या गोष्टींचा ताण घेतल्यास डोकेदुखी, मायग्रेन सारख्या समस्या जाणवतील.
वृषभ : आज तुमच्या मेहनतीचे आणि प्रयत्नांचे फळ मिळेल. बऱ्याच काळानंतर मित्रांच्या भेटीत तुम्हाला आनंद वाटेल. मुलांवर अधिक बंधने लादल्यास त्यांची कार्यक्षमता कमी होऊ शकते. तुमच्या नकारात्मक टिप्पण्या मित्राला अस्वस्थ करू शकतात याची जाणीव ठेवा. व्यवसायाशी संबंधित कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतील. पती-पत्नीच्या नात्यात गोडवा येईल. आरोग्य चांगले राहील.
मिथुन : आज घरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन कराल. भविष्यातील ध्येयांवर लक्ष केंद्रित केल्यास तुम्हाला योग्य यश मिळेल. काही नवीन संपर्क प्रस्थापित होतील. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवणे हानिकारक ठरेल. स्वार्थी आणि नकारात्मक लोक तुमच्या भावनांचा फायदा घेऊ शकतात. वैयक्तिक आणि व्यावसायिक कामांमध्ये चांगला समन्वय साधाल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. ताप आणि अंगदुखीच्या तक्रारी जाणवतील.
कर्क : कौटुंबिक वाद सोडवण्याचा प्रयत्न करा. रखडलेली सरकारी कामे अधिकाऱ्याच्या मदतीने पूर्ण होतील. तुमचे कोणतेही रहस्य उघड होऊ शकते याची काळजी घ्या. जवळच्या मित्राशी संबंध खराब होऊ शकतात. मनशांतीसाठी थोडा वेळ एकांतात राहा. व्यवसायिक कामे सामान्य राहतील. पती-पत्नीमध्ये सलोखा राहील. आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका.
सिंह : आज दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी करा. ग्रहस्थिती अनुकूल आहे. वैयक्तिक आणि आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी ही एक महत्त्वाची योजना आखाल. घर नीटनेटके ठेवण्यात तुम्ही व्यस्त असाल. आळशीपणामुळे महत्त्वाचे काम टाळू नका अन्यथा तुमचे नुकसान होईल. कोणतीही अप्रिय बातमी तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम करू शकते. सध्याचे व्यावसायिक कामकाज संथ असले. तुमच्या क्षमतेनुसार काम करा. जोडीदाराला भेटवस्तू द्याल. आरोग्य थोडे नरम राहू शकते.
कन्या : आजचा बराचसा वेळ धर्म-कर्माशी संबंधित कार्यात व्यतीत होईल. यामुळे तुम्हाला मनःशांती लाभेल. जमिनीशी संबंधित प्रलंबित कामात निर्णय घेण्याची आजच योग्य वेळ आहे. काही जवळच्या लोकांनी सांगितलेल्या गोष्टीबद्दल मनात शंका किंवा निराशेची स्थिती निर्माण होऊ शकते. आपल्या विचारांमध्ये सातत्य आणि संयम ठेवा. कोणतेही काम समजूतदारपणा आणि दूरदृष्टीने करण्याची गरज आहे. पती-पत्नी एकत्र घर-कौटुंबिक काळजी घेण्याच्या योजनांवर चर्चा करतील. वातावरण बदलाचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता.
तूळ : परिस्थिती हळूहळू तुमच्यासाठी अनुकूल होत आहे. समविचारी लोकांशी संपर्क होईल. तुमची प्रतिभा लोकांसमोर येईल. राजकीय कामे पूर्ण करण्यासाठी अनुभवी व्यक्तीचाही सहभाग असेल. रागामुळे तुमचे काम बिघडू शकते याची जाणीव ठेवा. आर्थिक फायद्याचे मार्ग तयार होईल. चुकीच्या खर्चावर नियंत्रण ठेवा. एखादे काम पूर्ण करण्यासाठी तुमच्या मेहनतीचे आणि परिश्रमाचे योग्य फळ तुम्हाला मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. वाहन चालवताना काळजी घ्या.
वृश्चिक : आज कुटुंबीक समस्या शांततेने सोडवू शकाल. करिअर, अध्यात्म आणि धर्माच्या प्रगतीसाठी तुमच्या क्षमतांचा वापर करण्याचा प्रयत्न करा. मुलांसाठीही तुमचे पूर्ण सहकार्य असेल. आर्थिक स्थिती थोडी बिघडू शकते; पण लवकरच परिस्थिती नियंत्रणात येईल. विद्यार्थ्यांनी चुकीच्या कामात आपला वेळ वाया घालवू नये. एखाद्याला व्यवसायात अडचणी येऊ शकतात. व्यवसायातील तणावाचा तुमच्या वैवाहिक जीवनावर परिणाम होऊ देऊ नका. आरोग्य चांगले राहिल.
धनु : मागील काही दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. योग्यवेळी योग्य निर्णय घेणे तुमच्यासाठी चांगले राहील. समविचारी आणि सकारात्मक लोकांच्या संपर्कात रहा. व्यवसायातील प्रत्येक गोष्ट गांभीर्याने आणि साधेपणाने करा. कुटुंबातील वातावरण थोडे तणावपूर्ण राहील. पोटदुखी होऊ शकते.
धनु : मागील काही दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. योग्यवेळी योग्य निर्णय घेणे तुमच्यासाठी चांगले राहील. समविचारी आणि सकारात्मक लोकांच्या संपर्कात रहा. व्यवसायातील प्रत्येक गोष्ट गांभीर्याने आणि साधेपणाने करा. कुटुंबातील वातावरण थोडे तणावपूर्ण राहील. पोटदुखी होऊ शकते.
कुंभ : आज दीर्घकालीन लाभाच्या योजनेवर काम सुरू होऊ शकते. काम आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा समन्वय साधणे आव्हानात्मक असू शकते. तुम्ही सर्व कामे व्यवस्थित पार पाडू शकाल. तुमच्या जवळचे लोकच कामात व्यत्यय आणू शकतात याची जाणीव ठेवा. स्वतःचे निर्णय घ्या. व्यवसायाशी संबंधित कोणतीही मोठी ऑर्डर मिळू शकते. वैवाहिक जीवन तणावपूर्ण राहिल. ताप किंवा शारीरिक थकवा जाणवेल.
मीन : इच्छित कामे वेळेवर पूर्ण झाल्यास मन प्रसन्न राहील. प्रत्येक आव्हान स्वीकारा. विशेषतः महिला घरात आणि बाहेर दोन्ही ठिकाणी योग्य समन्वय राखतील. आर्थिक बाबतीत तुमच्या बजेटवर लक्ष ठेवा. सर्व काही असूनही तुम्ही कोणत्याही प्रकारची शून्यता अनुभवू शकता. व्यवसायात तुम्हाला मोठी ऑर्डर मिळू शकते. पती-पत्नीमध्ये एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो.