जळगाव मिरर | ९ ऑगस्ट २०२४
शिवसेना जळगाव महानगर च्या वतीने भगव्या सप्ताह निमित्त शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राज्यभर दिनांक 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट या कालावधीमध्ये भगव्या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या सप्ताहामध्ये सदस्य नोंदणी अभियान शाखा उद्घाटन नवीन मतदार नोंदणी घर तिथे शिवसैनिक गाव तिथे शिवसेना यासह अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना जळगाव महानगर च्या वतीने विविध उपक्रम राबवले जाणार असून आज रोजी शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे महानगर प्रमुख शरद तायडे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन माजी उपमहापौर कुलभूषण पाटील महिला आघाडी महानगरप्रमुख गायत्री सोनवणे उपमहा नगर प्रमुख निता सांगोळे महानगर समन्वयक अंकुश कोळी उपमहा नगर प्रमुख प्रशांत सुरळकर मानसिंग सोनवणे विभाग प्रमुख किरण भावसार निलेश ठाकरे कार्यालय प्रमुख संजय सांगळे कलीम खान युवा सेना उपमा नगर प्रमुख गिरीश कोल्हे उपजिल्हाप्रमुख विशाल वाणी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते