जळगाव मिरर | ३० जुलै २०२६
जळगाव जिल्हा चर्मकार विकास संघातर्फे बुधवार दिनांक 29 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजता गुरु पौर्णिमा तथा गुरु रविदास यांच्या 650 व्या जयंतीनिमित भारत सरकारतर्फे आयोजित सामाजिक समरसता संकल्प अभियान कार्यक्रम 257,भास्कर मार्केट येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री.काशिनाथ इंगळे यांच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या सुरवातीस जाणता राजा श्री.छत्रपती शिवाजी महाराज,विश्वरत्न ,तथा भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर व जगतगुरु संत रविदास महाराज यांच्या प्रतिमे स ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. ज्ञानदेव भारुडे, श्री प्रकाश रोजतकर, सरपंच श्री राजेश वाडेकर सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.या प्रसंगी श्री.संजय वानखेडे सर यांनी गुरु रविदास यांच्या 650 व्या जयंतीनिमित भारत सरकारतर्फे दिनांक 29 जुलै गुरुपौर्णिमे पासून तर दिनांक 20 फेब्रुवारी गुरु रविदास जयंतीपर्यंत संत रविदास यांच्या समता,मानवता या गुणांचा तसेच त्यांच्या जीवनकार्याचा प्रचार व प्रसार व्हावा या हेतूने सामाजिक समरसता संकल्प अभियान आयोजनामागची भूमिका सांगितली तसेच आपल्या प्रत्येकाच्या जीवन विकासात असलेले गुरूंचे महत्व स्पष्ट करून त्यांच्या प्रति ऋण व्यक्त केले.
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते श्री. रतीराम सावकारे,श्री.काशिनाथ इंगळे,श्री.विश्वनाथ सावकारे श्री.लिलाधरभारुळे ,श्री.प्रकाश रोजतकर,श्री. ज्ञानदेव भारुळे, सरपंच श्री.राजेश वाडेकर सर,,प्रा.श्री.धनराज भारुडे,प्रा.श्री.संदीप शेकोकार,श्री.संदीप ठोसर सर,श्री.सुजल सावकारे,आदींनी मनोगत व्यक्त करून गुरु रविदास यांच्या जीवनकार्याची माहिती तसेच गुरूंचे महत्व सांगितले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.संजय वानखेडे सर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.श्री.धनराज भारुडे यांनी केले.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.काशिनाथ इंगळे,श्री.संजय वानखेडे सर,श्री.विश्वनाथ सावकारे,श्री.प्रकाश रोजतकर,श्री. कमलाकर ठोसर यांनी परिश्रम घेतले.




















