जळगाव मिरर | ३ ऑक्टोबर २०२४
शहरातील विचार वारसा फाऊंडेशनची महिला संघटनेची कार्यकारिणी नवदुर्गउत्सवानिमित्त नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदी संगीता राजपूत यांची तर सचिवपदी अलकनंदा देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.
फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकी नवदुर्ग उत्सवानिमित्त घ्यावयाच्या उपक्रमांची चर्चा करून नियोजन करण्यात आले. प्रसंगी एकमताने कार्यकारिणी गठीत झाली. अध्यक्षपदी संगीता राजपूत, उपाध्यक्ष म्हणून सुनीता डांगे, सचिव अलकनंदा देशमुख, कार्याध्यक्षपदी सुरेखा निकम, सहसचिव रंजन बावस्कर,सदस्य,-संगीत दळवी,सुषमा काकडे, संध्या सावकारे, आशा म्हसकर,पूजा ढाकणे,पूजा देशमुख, वैष्णवी राजपूत,दिपमाला पाटील,सिंधू मांडोळे,सविता तोमर,मंदा जाधव, राणी मांडोळे,रिता वाघ,शितल पाटील, मंगला मांडोळे,कल्पना महाले,मंगल सनसे, सुनिता पाटील,नेहा जैस्वाल,कल्पना ढाकणे,यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारिणीचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत असून नवरात्री उत्सवात रामेश्वर कॉलनीतील भाविकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन अध्यक्षा संगीता राजपूत यांनी केले आहे.