
जळगाव मिरर | १७ जानेवारी २०२५
माझ्यावर भावावर दाखल केलेली केस मागे घेत नाही, त्यामुळे माझा भाऊ अजून सुटला नाही त्याचा बदला बाकी आहे, म्हणत तरुणाने तरुणीसह तिच्या आई वडीलांवर धारदार लोखंडी पट्टीने वार केले. यामध्ये तरुणीसह तिचे आईवडील गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास चौघुले प्लॉट परिसरात घडली. याप्रकरणी संशयित खुशाल पिंतांबर सोनार (रा. चौघुले प्लॉट) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील चौघुले प्लाट परिसरात राहणाऱ्या चेतन पितांबर सोनार याच्याविरुद्ध शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल केला होता. त्याची केस न्यायालयात सुरु असून तो सद्या कारागृहात आहे. हे. ती केस मागे घेण्यासाठी त्याचे नातेवाईक हे तरुणीसह तिच्या कुटुंबियांवर दबाव आणून त्यांच्यासोबत नेहमी वाद घालीत असतात. दि. १५ जानेवारी रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास संशयित खुशाल सोनार याने शौचास गेलेल्या दीपक पाटील यांच्यावर लोखंडी धारदार पट्टीने वार केले. दीपक पाटील हे जखमी अार केले दीपक पाटील है जखमा मुलीसह पोलिसात तक्रार देण्यासाठी जात होते. दरम्यान, रस्त्याने जातांना खुशाल सोनार याने त्याची दुचाकी त्यांच्यासमोर थांबवली. दुचाकीवरुन खाली उतरून त्याने कमरेला लावलेली धारदार लोखंडी पट्टी मारण्यासाठी फिरवू लागला. यावेळी त्याने तरुणीसह तिच्या आईला अश्लिल शिवीगाळ करीत माझ्यावर केलेली केस अजून मागे घेत नाही, त्यामुळे माझा भाऊ अजून सुटला नाही, त्याचा बदला बाकी आहे म्हणत यांच्या डोळ्याच्या आणि डोक्यात वार केले.
पतीवर वार होत असल्याने त्यांची पत्नी माधूरी पाटील या त्यांना सोडविण्यासाठी गेल्या असता, त्यांच्यावर देखील तरुणाने पट्टीने वार केले. यामध्ये त्यांच्या मनगटावर दुखापत झाली. यावेळी तरुणाने एका हाताने महिलेचा गळा धरुन दुसऱ्या हाताने पट्टीने वार करीत असतांना तरुणीने तो वार अडविण्याचा प्रयत्न केला असता, त्यामध्ये तरुणीच्या बोटाला दुखापत होवून ती देखील जखमी झाली.