जळगाव मिरर | ५ ऑगस्ट २०२५
लहान मुलांच्या क्रिकेटच्या खेळण्याच्या कारणावरुन दोन कुटुंबियांमध्ये वाद झाले. यामध्ये ताराबाई सुकलाल शिंदे (वय ६०, रा. नावखुर्द, ता. जळगाव जामोद, जि. बुलढाणा, ह. मु. कालिंका माता चौक) यांना लाकडी दांडक्याने मारहाण करीत जखमी केले. ही घटना दि. २ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास कालिंका माता मंदिराजवळ घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, बुलढाणा जिल्ह्यातील नावखुर्द येथील ताराबाई शिंदे या कालिंका माता मंदिर परिसरात वास्तव्यास असून त्या ताळपत्री शिवण्याचे काम करतात. दि. २ रोजी रात्रीच्या समारास लहान मलांच्या क्रिकेट खेळण्याच्या कारणावरुन वाद झाले. या भांडणावरुन संशयित विजू शिं याने महिलेला शिवीगाळ करीत त्याचया हातातील लाकडी काठी त्यांच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. तसेच त्यांचा मुलगा एकनाथ व सून सुनिता यांनी देखील त्यांना मारहाण करीत जखमी केले आणि जीवेठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान, ताराबाई शिंदे यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित सुनिता आवल्या शिंदे, विजू पिंटू शिंदे, अमोल सुकलाल साळुंखे, देविदास लाला सोळंखे (सर्व रा. मोदीपूर, ता. जळगाव जामोद, जि. बुलढाणा, ह. मु. कालिंका माता मंदिर परिसर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ गणेश वंजारी हे करीत आहे.




















