जळगाव मिरर | १ डिसेंबर २०२४
खान्देशातील शिरपूर शहरात पंडित प्रदीप मिश्रा यांच्या उपस्थितीत शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. १ ते ७ डिसेंबर या कालावधीत प्रवचण होणार आहे. दरम्यान, शनिवारी संध्याकाळी पंडित प्रदीप मिश्रा यांच्या आगमनानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. शिरपूरवासीयांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.
शनिवारी संध्याकाळी पंडित प्रदीप मिश्रा यांचे शिरपूरला आगमण झाले. त्यांची शोभायात्रा शहरातील किसान विद्या प्रसारक संस्थेच्या कार्यालयापासून ते पाटील वाड्यापर्यंत काढण्यात आली. शोभायात्रेत भाविकांनी मोठी गर्दी केली होती. करवंद नाका येथे शिवशंकर भगवान यांची मोठी मूर्ती ठेवण्यात आली आहे. कथेचे आयोजक माजी नगरसेवक हेमंत पाटील व भाजपचे ज्येष्ठ नेते मोहन पाटील हे आहेत. उत्सव समितीत प्रसाद पाटील, अॅड. सुहास वैद्य, अनिल अग्रवाल, अॅड. अमित जैन, शरद अग्रवाल, रोहित शेटे, नितीन धाकड, अशोक शर्मा, अमोल पाटील आदी कार्यक्रमाचे नियोजन करीत आहेत
१ ते ७ डिसेंबरदरम्यान रोज दुपारी १ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत शहरातील करवंद नाक्याजवळील भगवान महावीर जैन उद्यानाच्या जागेवर शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी खान्देशासह मध्यप्रदेश, गुजरात येथून १० ते १२ लाख भाविक रोज कथास्थळी येतील, त्यादृष्टीने आयोजन समितीकडून तयारी करण्यात आलेली आहे.