जळगाव मिरर | ३१ डिसेंबर २०२३
राज्यात गेल्या काही महिन्यापासून बससह अनेक वाहनांचा नियमित अपघात होत असल्याच्या अनेक घटना घडत आहे. नुकतेच वर्षाच्या अखेरीस पालघरच्या मनोर- विक्रमगड रोडवर बस आणि डंपरमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना दि. ३० डिसेंबर शनिवारी घडली आहे. या अपघातात दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला असून १० ते १५ प्रवासी जखमी झाले आहेत. या भयंकर अपघाताचे थरकाप उडवणारे सीसीटिव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पालघरच्या मनोर विक्रमगड रोडवर शनिवारी ३० डिसेंबर रोजी बस आणि डंपरमध्ये भीषण अपघात झाला. मनोर विक्रमगड रोडवर बोरांडा येथे भरधाव डंपरने बसला समोरुन जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये बसमधील दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला तर १५- २० प्रवासी गंभीर जखमी झाले. भरधाव डंपर आणि बसची समोरासमोर झालेली ही धडक इतकी भीषण होती की बसचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघाताचे सीसीटिव्ही फुटेज समोर आले आहे. अवघ्या सहा सेकंदाचा हा व्हिडिओ काळजाचा थरकाप उडवणारा आहे.
पालघर – मनोर विक्रमगड मार्गावर बस- डंपरचा भीषण अपघात! थरकाप उडवणारे CCTV Footage #Accidentvideo #Palghar #CCTV pic.twitter.com/RogHir5Hnw
— Gangappa Pujari (@GangappaPujar07) December 31, 2023
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, भरधाव डंपर आणि बस छोट्याशा रस्त्यावरुन सुसाट वेगात एकमेकांसमोर येतात. काही समजायच्या आत दोन्ही वाहनांची जोरदार धडक होते. ही धडक इतकी भीषण असते की बसची एक बाजू पुर्णपणे उध्वस्त होते. या अपघातात २ जण ठार झाले असून २० पेक्षा अधिक प्रवासी जखमी झालेत.