जळगाव मिरर | १३ डिसेंबर २०२४
भडगाव तालुक्यातील कजगाव येथील भडगाव मार्गावरील स्वामी हटके वडा अँड अमृततुल्य व स्वामी जीन्स कॉर्नर या दोन दुकानांना शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यात जवळपास साडेतीन लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येथील कजगाव भडगाव मार्गावरील रणजित पाटील यांच्या मालकीचे स्वामी हटके वडा अँड अमृततुल्य तर प्रशांत पाटील यांच्या मालकीचे स्वामी जीन्स कॉर्नर या दोन दुकानांना ११ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यातील स्वामी हटके वडा अँड अमृततुल्य हे दुकान जळून खाक झाले आहे. तर शेजारीच असलेल्या स्वामी जीन्स कॉर्नर या दुकानातील रेडिमेड कापडसह फर्निचर जळाल्याने या दुकानाचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे- या आगीत दोन्ही दुकानातील मिळून अंदाजे साडेतीन लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. दमऱ्यान ग्रामस्थांनी वेळीच धाऊन पाण्याच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. या प्रसंगी घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती.