जळगाव मिरर । २० मे २०२३
जिल्ह्यात झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत निवडणूक लागल्या पासून अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या होत्या. तर या निवडणुकीत अनेक मुद्दे देखील गाजले होते. जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणून आले आहे. तर आज झालेल्या सभापती पदासाठी निवडणुकीत नाराजी नाटय रंगले. त्यानंतर आरोप-प्रत्यारोप करीत नाट्यमय घडामोडी घडल्या. अखेर सभापतीपदी श्यामकांत सोनवणे तर उपसभापतीपदी पांडुरंग पाटील यांची निवड करण्यात आली.
श्यामकांत सोनवणे यांनी महाविकास आघाडीच्या संचालकांसोबतच भाजप आणि शिंदे गटाच्या संचालकांची मदत घेऊन सभापती पदाची माळ आपल्या गळ्यात पाडून घेतली. तर सभापतीपदी निवडून आलेले श्यामकांत सोनवणे यांना १८ पैकी १५ मते मिळाली. तर उपसभापती पदासाठी पाडूरंग पाटील यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध करण्यात आली. सभापती पदासाठी महाविकास आघाडीकडून श्यामकांत सोनवणे यांच्या सोबतच महाविकास आघाडीचे संचालक लक्ष्मण पाटील हे देखील इच्छुक होते. त्यांनी देखील सभापती पदासाठी अर्ज घेतला होता. मात्र, आपल्याला श्यामकांत सोनवणे, दिलीप कोळी यांच्यासह इतर काही संचालकांनी दबाव आणून माघार घ्यायला लावल्याचा आरोप संचालक लक्ष्मण पाटील यांनी केला. या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीमध्ये बिघाडी दिसून आली. भाजप आणि शिंदे गटाने खेळी करून श्यामकांत सोनवणे यांना सभापतीपदी विराजमान केले आहे.