• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

घन:श्याम काशीराम विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 23, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
घन:श्याम काशीराम विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २३ डिसेंबर २०२२

यावल तालुक्यातील आमोदे शिक्षण प्रसारक मंडळाच्या घन:श्याम काशिराम विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. विविध परीक्षा व विषयांमध्ये उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना देणगीदारांच्या ठेवीतून सुमारे तेवीस हजारांची रोख रकमेची पारितोषिके देवून त्यांचा गौरव करण्यात आला.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून कवी, शिक्षक व व्याख्याते सेंट अलॉयसियस प्राथमिक शाळेतील शिक्षक जीवन महाजन यांच्यासह संस्थाध्यक्ष उमेश पाटील, उपाध्यक्ष विनायक पाटील, चिटणीस प्रा. उमाकांत पाटील, घ.का. विद्यालयाचे चेअरमन ललित महाजन, खाजगी प्राथमिक शाळेचे चेअरमन धनराज चौधरी, सदस्य प्रमोद वाघुळदे, एकनाथ लोखंडे, वैभव चौधरी, प्रवीण महाजन सर, माध्यमिकचे मुख्याध्यापक संजीव बोठे, प्राथमिकचे मुख्याध्यापक लक्ष्मीकांत पाटील, माजी मुख्याध्यापक तसेच ठेवीदार असलेले के.एच. पाटील सर, पी.पी जाधव सर आदी उपस्थित होते. प्रारंभी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. जगदीश पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, सरस्वती माता व साने गुरूजी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर प्रमुख अतिथी जीवन महाजन यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व दोन बालकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. नववी-दहावीच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागत गीत म्हटले. संस्थाध्यक्ष उमेश प्रभाकर पाटील प्रास्ताविकात म्हणाले की, ठेवीदार दात्यांनी विद्यालयात ठेवलेल्या 4 लाख 19 हजार 448 रूपयांवरील व्याज 23 हजार 484 रूपयांची रोख रक्कम बक्षीस रूपाने दिली जात असून विद्यार्थ्यांनी अधिकाधिक प्रयत्नशील राहून बक्षीस पटकवावे. प्रमुख अतिथींचा परिचय संस्थेचे चिटणीस प्रा. उमाकांत पाटील यांनी करून दिला तर मुख्याध्यापक एस.बी. बोठे यांनी नवीन येणाऱ्या ठेवींची घोषणा केली. यानंतर इयत्ता दहावीत प्रथम तेजल कैलास पाटील, द्वितीय योगिता युवराज सरोदे, तृतीय हेमांगी प्रमोद वाघुळदे यांच्यासह अन्य गुणवंत विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. जगदीश पाटील, प्रमुख अतिथी जीवन महाजन व संस्थाचालकांच्या हस्ते रोख रकमेची बक्षीसे देऊन गौरविण्यात आले. पारितोषिक प्राप्त विद्यार्थी व शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे म्हणून जीवन महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर अध्यक्षीय मनोगतातून डॉ. जगदीश पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वर चौधरी सर यांनी केले. बक्षीस वाचन जे. व्ही. वानखेडे सर यांनी तर आभार पी.एस. पाटील सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

मातापित्याचा आदर करावा – जीवन महाजन
विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रमासोबत नैतिक मूल्य जपली पाहिजेत. तसेच आपल्या मातापित्यांचा, गुरूजनांचा आदर केला पाहिजे. चांगली संगत धरल्यास आपल्या अंगीदेखील चांगले गुण येतात. आईवडील रागावून अथवा प्रेमाने काही गोष्टी आपल्याला सांगत असतील तर त्यामागील हेतू जाणून घ्यावा. कारण अगदी जन्मापासूनच ते आपल्यावर उत्कृष्ट असे नानाविध संस्कार करत असतात, असे सांगतानाच कवी, शिक्षक तथा व्याख्याते भुसावळ येथील सेंट अलॉयसियस प्राथमिक शाळेतील शिक्षक जीवन महाजन यांनी स्वलिखित ‘बाप’ या कवितेचे सुंदर गायन केले. त्यातून मुलांना भावनिक साद घालून बसल्या जागेवरच प्रत्येकाचाच बाप आठवायला भाग पाडले. यावेळी विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले.

अध्ययन क्षमता वाढवावी – डॉ. जगदीश पाटील
शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये अध्ययन निष्पत्ती देण्यात आली असून त्यानुसार पाठांची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तक अभ्यासण्याच्या आधी अध्ययन निष्पत्ती वाचाव्या. त्यातून आपल्याला नेमका अभ्यास काय करायचा आहे याची कल्पना येईल. ज्ञान, आकलन, उपयोजन, विश्लेषण, मूल्यमापन आणि नवनिर्मिती या पायऱ्यांनी आपल्याला वाटचाल करायची असून स्वमत आणि अभिव्यक्तीकडे देखील लक्ष द्यायचे आहे. त्यामुळे आपली अध्ययन क्षमता वाढवावी, असे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा याबाबत बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

Related Posts

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!
क्राईम

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!
क्राईम

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

घराला कुलूप लावून बाहेर गेले अन् चोरट्यांनी डाव साधला : चाळीसगावात ६.४५ लाखांची चोरी!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group