जळगाव मिरर | ९ ऑगस्ट २०२३
राज्यात गेल्या दोन वर्षा आधी धर्मवीर या चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली होती. शिवसेनेत मोठी फूट पडलीचे चित्र देखील राज्याने पाहिले होते. आता याच ‘धर्मवीर २’ चित्रपटाची दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी आज घोषणा केली आहे.
राज्यातील लाखो चाहत्यांना धर्मवीर-२ मध्ये साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट अशी टॅगलाईन देखील देण्यात आली आहे. या चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई, आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी नुकतीच जेजुरीच्या खंडोबाचा आशीर्वाद घेऊन या चित्रपटाची घोषणा केली आहे.
यावेळी निर्माते देसाई म्हणाले की धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे भाग एकच्या माध्यमातून आनंद दिघे साहेबांचे चरित्र राज्यातील जनतेसमोर आलं पाहिजे आनंदी के साहेब यांच्या माध्यमातून सर्व जगात पोहोचलेले आणि असा माणूस होणे नाही हेही जनतेला समजलं पाहिजे त्यांच्या आयुष्यातील अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आज देखील जनतेसमोर आलेल्या नाहीत म्हणून धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे याचा भाग दोन याचा चित्रकरण आम्ही सुरू करतोय लवकरच आगामी काळात धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे दोन साहेबांचे हिंदुत्वाची गोष्ट आपल्यासमोर आम्ही मांडणार आहोत.