जळगाव मिरर | ३१ जुलै २०२६
भरधाव डंपरच्या धडकेत आरएल चौफुलीकडून आर. जी. मेटल कंपनीकडे जात असलेल्या दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या अपघातात संदीप दगडू अलकरी (वय ४८, रा. सदगुरु नगर) यांचा जागीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी धडक देणाऱ्या डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सदगुरु नगरात राहणारे संदीप अलकरी हे दि. २६ जुलै रोजी दुपारच्या सुमारास (एमएच १९, डीडबल्यू २४९९) क्रमांकाच्या दुचाकीने आर. एल. चौफुलीकडून आर. जी. मेटल अॅण्ड कंपनीकडे जात होते. यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच ३०, एल २१५२) क्रमांकाच्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात संदीप अलकरी यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर डंपरचालक हा तेथून पसार झाला होता. याप्रकरणी किरण अलकरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक अशोक काळे हे करीत आहे.




















