जळगाव मिरर | १४ ऑक्टोबर २०२३
जगभरातील अनेक देशात वेगवेगळ्या पद्धतीने व प्रथा असतात. सध्या मात्र एका देशाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. आफ्रिकेच्या इरिट्रियामध्ये पुरुषांना चक्क दोन लग्न बंधनकारक करण्यात आले आहे. विशेष म्हणजे येथे दोन विवाह न करणाऱ्या पुरुषांना कारागृहात पाठविले जाते.
विवाह आणि धार्मिक बाबींबाबत प्रत्येक देशाचे स्वतःचे कायदे आहेत. प्रत्येकाची स्वतःची परंपरा आणि प्रथा आहेत. भारतातही एक काळात बहुपत्नीत्वाची प्रथा प्रचलित होती, पण हळूहळू ही प्रथा सर्वत्र बंद झाली. मात्र, अजूनही असा एक अनोखा देश आहे, जिथे एक नाही तर दोन लग्ने होतात, तीही महिलांची नव्हे, तर केवळ पुरुषांची! महत्त्वाचे म्हणजे या प्रथेला कुणीही विरोध करीत नाही, तर अतिशय आनंदाने ही प्रथा पार पाडली जाते.
जर एखाद्या माणसाने यावर आक्षेप घेतला, तर त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. एवढेच नाही तर बायकाही पतींना दुसरी बायको करण्यापासून रोखू शकत नाहीत अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागते या विचित्र प्रथेमागे देशात महिलांची असलेली सर्वाधिक लोकसंख्याच कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते. ही बाब लक्षात घेऊन समतोल राखण्यासाठी ही प्रथा सुरू केली आहे. त्यामुळे येथील पुरुषांची इच्छा नसली तरी त्यांना दोन बायका सांभाळाव्या लागतात; परंतु या प्रथेमुळे इरिट्रिया या देशाला अनेक टीकांना सामोरेदेखील जावे लागते.