चाळीसगाव : कल्पेश महाले
चाळीसगाव तालुक्यातील बहाळसह भऊर, वरखेडे बुद्रुक, खुर्द व मेहुणबारे या चार ग्रामपंचायतीनी आयोजित केलेल्या ग्रामसभेत गिरणा नदीमधील बाळू लिलाव करण्याच्या ठरावाला विरोध दर्शवला आहे. या परिसरात मुबलक वाळू साठा असल्याने या ठरावाकडे लक्ष होते, परंतु ग्रामस्थांनी विरोध केल्याने वाळू माफियांचा भ्रमनिराश झाला.
बहाळ येथे वाळू लिलावासंदर्भात प्रांतधिकारी प्रमोद हिले यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन केले होते. या वेळी बहाळचे हजारो ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांनी वाळू लिलावास तीव्र विरोध दर्शवला. तसेच याच विषयावर चाळीसगाव तालुक्यात आज भऊर भाग १.२,३, तामसवाडी, वरखेडे बुद्रुक, बरखेडे खुर्द, मेहुणबारे आदी गावात विशेष ग्राम सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या सर्व गावातील ग्रामस्थांनी या ठरावला तीव्र विरोध दर्शवला. वाळू उत्खनानामुळे गावातील जलस्रोतावर विपरीत परिणाम होतो. सोबतच गावात वाळूच्या उपशावरून भांडणे होतात. त्यामुळे ग्रामपंचायतींनी वाळू गटाचे लिलाव करण्यास विरोध केला आहे.
ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा गिरणा नदीवर अवलंबून आहे. वाळू उपसा झाल्यास पिण्यास पाणी मिळणार नसल्याने वाळू लिलावास विरोध करण्यात आला. दरम्यान, जिल्ह्यात नव्याने वाळू गटांच्या लिलावाची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. मात्र बहाळ ग्रामपंचायत हद्दीतील गट नं. ८४६ व ८२६च्या काही भागातील नदीपात्रातील वाळू गटांच्या लिलावासाठी ग्रामसभेचा ठराव आवश्यक असतो. त्यासाठी हे ठराव जिल्हा प्रशासनाने मागवलेले आहेत. मात्र, गिरणा नदी पात्रातील गटांमधून वाळूचे उत्खनन होणार नाही, याची दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतींची राहणार आहे. त्या गटातून वाळू उत्खनन होत असल्याचे दिसल्यास त्याला ग्रामपंचायतींनी प्रतिबंध करावा. तर सन २०२३ / २४साठी यापूर्वी ६ रोजी तामसवाडी ग्रामपंचायतीचा वाळू लिलावाला विरोधाचा ठराव देण्यात आला होता. दरम्यान, अप्पर तहसीलदार जगदीश भरकर यांनी नदी पात्रातील वाळू घाट निश्चित केले आहेत. यात ३२ हजार ५०० चौरस मीटर याच भागातील ३४ हजार ब्रास वाळू उपसा केला जाईल, असे सांगितले. दरम्यान, तहसीलदार प्रशांत पाटील यांनी वाळू ठरावाला विरोध करण्यासाठी जसे आला आहात, तसाच विरोध गावातील दारूबंदी विरोधात करून ठराव करावा, असे सांगून ग्रामस्थांचे त्यांनी आभार मानले.
यावेळी प्रांतधिकारी प्रमोद हिले, तहसीलदार प्रशांत पाटील, बहाळचे मंडळ अधिकारी विष्णुकुमार राठोड, मेहुणबारे येथील मंडळधिकरी सुनील पवार, शिरसगावचे मंडळाधिकारी उल्हास देशपांडे, तलाठी सचिन हातोडे, तलाठी प्रशांत कणकुरे, पोलीस पाटील हरिश्चंद्र पाटील, ग्रामसेवक पंकज चव्हाण, सरपंच राजेंद्र मोरे, उपसरपंच किरण पाटील, ग्राम पंचायत सदस्य नाना भोई, प्रकाश ठाकूर, राकेश शिरुडे, माजी सभापतील आर. एल. पाटील, दशरथ मोरे, गुलाब पाटील, सोसायटीचे संचालक कैलास शिंपी, संदीप पाटील, नेताजी पाटील, विक्रम महाजन, सुभाष कोळी, राहुल परदेशी, वाल्मीक पाटील, ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांच्यासह हजारो ग्रामस्थ उपस्थित होते.