जळगाव मिरर | ३० जुलै २०२६
येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला.ना. सा.विद्यालयात बुधवार दिनांक 29 जुलै रोजी गुरु पौर्णिमेनिमित भैय्यासाहेब गंधे सभागृहात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात शालेय विद्यार्थांनी गुरूंचा यथोचित सन्मान केला.या कार्यक्रमाच्या सुरवातीस शाळेचे मुख्याध्यापक श्री.सचिन देशपांडे,उपमुख्याध्यापक श्री प्रशांत जगताप, पर्यवेक्षक श्री.संजय वानखेडे,पर्यवेक्षिका सौ. रमा तारे,ज्येष्ठ शिक्षक श्री.आनंद चौधरी,सौ.पद्मजा जोशी,श्री.अशोक पाटील, सौ.मंगला भारुडे,सौ.जयश्री नेहेते,श्री.दिलीप गायकवाड आदींच्या हस्ते सरस्वती देवता तसेच महाभारत रचनाकार गुरु महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

या प्रसंगी शाळेतील 25 विद्यार्थी तसेच 7 शिक्षकांनी गुरु पौर्णिमेचे महत्व ,गुरु शिष्य परंपरा यांची माहिती देऊन गुरूंचा प्रति ऋण व्यक्त केले.या प्रसंगी शाळेतील शिक्षक सौ.मंगला भारुडे श्रीमती संपदा तुंबडे , श्री.आनंद चौधरी यांनी गीत सादर करून गुरूंची महती स्पष्ट केली. शाळेतील विद्यार्थी प्रज्वल साळुंखे व सहकारी विद्यार्थांनी आजच्या A.I. युगात गुरूंचे गुणात्मक महत्व नाटिकेच्या रूपात प्रभावीपणे सादर केले. तसेच गुरूंच्या विविध गुण वैशिष्ट्यांची माहिती दिली. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन देशपांडे ,पर्यवेक्षक श्री.संजय वानखेडे,सौ.जयश्री नेहेते यांनी गुरु पौर्णिमेचे महत्व सांगून आपल्या जीवनातील आई,वडील,शिक्षक व ज्यांनी आपल्याला विविध विषयांचे ज्ञान दिले आपला विकास केला.
अशा सर्व गुरूंचा सन्मान करण्याचे व त्यांच्या प्रति ऋण व्यक्त करण्याचे आवाहन केले..या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.योगिता तडवी, सौ. यामिनी चौधरी यांनी तर सूत्र संचालन कुमारी मानवी ठाकूर,कुमारी रिद्धी धनगर, यांनी तर आभार प्रदर्शन कृष्णा नेरकर,लोकेश चितळे यांनी केले.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी श्री पांडुरंग सोनवणे,सौ.योगिता तडवी,श्रीमती संपदा तुंबडे,श्री.योगेश सोनजे ,सौ. मनीषा पवार,सौ.मधुश्री मदाने,सौ.जागृती मोराणकर ,श्री. किशोर माळी,सौ.अडकमोल,सौ.उषा बाविस्कर,श्री.भगवान बारी,श्री. सर्जु निंभोरकर,श्री.श्रीकांत घुगे,तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.





















