चाळीसगाव : कल्पेश महाले
चाळीसगाव प्रतिनिधी – शिक्षण घेताना इग्रंजी माध्यमाच्या शाळाच पाहिजे असे नाही कारण मराठी शाळेत देखील चांगले शिक्षण मिळते कारण विद्यार्थ्यांनी जिद्दीने आणि चिकाटीने अभ्यास केल्यास यश तुमचेच असेल असे प्रतिपादन चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी रयत सेना आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार व शालेय साहित्य वाटप प्रसंगी शहरातील पवारवाडी स्थित विठ्ठल रुख्मिणी मंदिर सभागृहात दि १० ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११ वाजता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.१० वी व १२ वीच्या विद्यार्थी,विद्यार्थिनी यांचा गौरवपत्र देवून सत्कार करण्यात आला तर इयत्ता ५ ते ७ वीच्या १०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक संदीप पाटील होते तर प्रमुख अतिथी म्हणून . रा. वि. चे संचालक प्रमोद पाटील, डॉ संदीप देशमुख, मा. नगरसेवक चंद्रकांत तायडे ,प्रा डॉ साधना निकम, स्वामी विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक एम आर जावळे,
उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. तद्दनंतर मान्यवरांचा सत्कार रयत सेनेच्या वतीने करण्यात आला.१० वी व १२ वीच्या विद्यार्थी,विद्यार्थिनी यांचा गौरवपत्र देवून सत्कार करण्यात आला. त्यानंतर स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या इयत्ता ५ ते ७ वीच्या १०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
पोलीस निरीक्षक संदीप पाटील साहेब पुढे बोलताना म्हणाले की शिक्षण घेऊन गरीबीच्या परीस्थितीवर मात करून अनेक अधिकारी घडले असून विद्यार्थ्यांनी जिद्दीने आणि चिकाटीने अभ्यास केल्यास यश तुमचेच असणार असल्याचे सांगितले. प्रास्ताविकातून रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी रयत सेनेने सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा उल्लेख केला. रा. वि. चे संचालक प्रमोद पाटील म्हणाले की रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे ,कामगारांच्या न्यायासाठी लढा देत आहे. गेल्या १५ वर्षांपासून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून विद्यार्थ्यांना मदत करत असल्याचे सांगत रयत सेनेचे कौतुकास्पद कार्य सुरू असल्याचे सांगितले. तर वाहतूक शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांनी बोलताना सांगितले की रयत सेनेने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व १० व १२ वीत चांगले मार्क घेऊन घवघवीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले असल्याचे सांगत कार्यक्रम स्तुत्य असल्याचे सांगितले. तेली समाज सेक्रेटरी चाळीसगांव बापूराव पवार गुरुजी म्हणाले की रयत सेना सर्वच क्षेत्रात न्यायाची भूमिका घेउन जनतेसाठी कौतुकास्पद कार्य करत असल्याचे सांगितलें,मिलींद चांदसरे म्हणाले की रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ पवार हे नेहमी गोरगरीब जनतेसाठी न्यायाची लढाई लढत असतात असा जनसेवक तालुक्याला लाभल्याने गोरगरिबांना शासकीय स्तरावर मोठा आधार लाभला असल्याचे सांगितलें, कार्यक्रमास उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष आबासाहेब गरुड, जामडी चे दीपक राजपूत, संभाजी ब्रिगेडचे तालुका उपाध्यक्ष गोरख साळुंखे, पी जी पाटील मॅडम, डी ए पाटील सर, एस आर पाटील सर, केशव वाघ,सर्कल गणेश लोखंडे, मा सभापती शिवाजी आमले, शेतकरी संघ संचालक अरुण पाटील, एड. राहुल वाकलकर, कबीर फाउंडेशनचे अध्यक्ष स्वप्निल जाधव, तेली युवा मंचचे अनिलभाऊ ठाकरे, भैय्या राजपूत, सतीश पवार, भिकन पवार ,सुनील पवार तर रयत सेनेचे पि एन पाटील, प्रमोद वाघ,खुशाल मराठे, नाना शिंदे, दिनेश चव्हाण, हेमंत पाटील, दीपक देशमुख, प्रदीप मराठे, स्वप्निल गायकवाड, सागर जाधव, छोटू अहिरे, अनिल कोल्हे, विजय दुबे, गोपाल पाटील, नरेंद्र पाटील छोटू पाटील,भगवान पाटील उपस्थित होते.सूत्रसंचालन सचिन नागमोती यांनी केले,तर आभार गणेश पवार यांनी माणले कार्यक्रमासाठी अधिक परिश्रम प्रमोद वाघ, स्वप्नील गायकवाड,सागर जाधव,मुकुंद पवार,भरत नवले, यांनी घेतले